रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच पुतिन यांच्या 'गर्लफ्रेंड'चा सन्मान, टीव्हीनं ऑन एअर केला जिम्नॅस्टिक प्रोग्रॅम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 01:21 IST2022-06-04T01:18:13+5:302022-06-04T01:21:08+5:30

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, 'फेस्टिव्हल अलिना' नावाचा हा कार्यक्रम गेल्या महिन्यात ऑलिम्पिक चॅम्पियनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मात्र बुधवारी रशिया-1 वाहिनीवर त्याचा प्रीमियर झाला. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

Russian tv broadcast a gymnastic festival program in honor of alleged girlfriend of vladimir putin | रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच पुतिन यांच्या 'गर्लफ्रेंड'चा सन्मान, टीव्हीनं ऑन एअर केला जिम्नॅस्टिक प्रोग्रॅम!

रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच पुतिन यांच्या 'गर्लफ्रेंड'चा सन्मान, टीव्हीनं ऑन एअर केला जिम्नॅस्टिक प्रोग्रॅम!

युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाच, रशियाच्या सरकारी टीव्ही चॅनेलने बुधवारी राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची कथित गर्लफ्रेंड अलिना काबएव्हा हिच्या सन्मानार्थ एका जिम्नॅस्टिक महोत्सवाचा कार्यक्रमाचे प्रसारण केले. विशेष म्हणजे रशिया-युक्रेन युद्धाच्या 100 व्या दिवशीच हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आहे.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, 'फेस्टिव्हल अलिना' नावाचा हा कार्यक्रम गेल्या महिन्यात ऑलिम्पिक चॅम्पियनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मात्र बुधवारी रशिया-1 वाहिनीवर त्याचा प्रीमियर झाला. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

या फेस्टिव्हलच्या आयोजनात लष्करी गाणे वाजवण्यात आले. तसेच या कार्यक्रमात सहभागी असलेल्या जिम्नॅस्ट्सनी लाल रंगाचा पोशाख परिधान केलेला होता, असे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत म्हणण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत मॉस्कोमध्ये आयोजित होणारा हा दुसरा अलिना महोत्सव असल्याचे दिसते, असे न्यूजवीकने दिलेल्या वृत्तात म्हणण्यात आले आहे.
 
Web Title: Russian tv broadcast a gymnastic festival program in honor of alleged girlfriend of vladimir putin