शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

"मित्राची मदत करणं कर्तव्य.." संकटकाळात दिला आधार; अमेरिकेच्या धमकीला रशियानं झुगारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:33 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील देशांना धमकी देत क्यूबाला तर तेल पाठवले तर त्यांच्यावर टॅरिफ लावू असा इशारा दिला होता.

वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅरिबियन बेटावरील देशाची ऊर्जा नाकेबंदी केली होती. जगातील कुठल्याही देशाला क्यूबाला तेल देण्याविरोधात धमकी दिली होती. ट्रम्प यांच्या धमकीमुळे अनेक देशांनी क्यूबाला मदत करणे टाळले. इंधनाच्या तुटवड्यामुळे क्यूबामधील परिस्थिती बिकट झाली. मात्र ट्रम्प यांच्या धमकीला झुगारून रशियाने ऊर्जा संकटाशी झुंजणाऱ्या क्यूबा देशाला कच्च्या तेलाचा टँकर पाठवला आहे. हा तेल टँकर क्यूबाला पोहचल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया रशियाने दिली.

रशियाने या महिन्याच्या सुरुवातीला अनातोली कोलोडकिन नावाचा एक निर्बंध घातलेला तेल टँकर क्यूबाला पाठवला होता. ज्यात जवळपास ७.३ लाख बॅरेल कच्चे तेल होते. अमेरिकेकडून क्यूबा देशाची ऊर्जा कोंडी करण्यात येत होती. क्यूबाला कुणीही तेल पाठवू नये असं अमेरिकेने बजावले होते. मात्र व्हेनेझुएलाकडून क्यूबाला तेल पुरवठा सुरू होता. परंतु तिथेही ट्रम्प यांनी सैन्य कारवाई करत मादुरो यांना अटक केली आणि तिथल्या तेलावर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे क्यूबावरील संकट वाढले. ऊर्जा संकटामुळे देशात वीज गायब झाली. अनेक अडचणींचा सामना तिथल्या लोकांना करावा लागला. अशा परिस्थितीत रशिया क्यूबा देशाच्या मदतीसाठी धावून पुढे आला.

शिपिंग डेटानुसार, रशियाचा तेल टँकर सोमवारी क्यूबाच्या उत्तर पूर्वेकडील किनाऱ्यावर पाहायला मिळाला. रशिया क्यूबाचा मित्र देश आहे. त्यांनी ऊर्जेवरील निर्बंधावर टीका करत अमेरिकेला लक्ष्य केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील देशांना धमकी देत क्यूबाला तर तेल पाठवले तर त्यांच्यावर टॅरिफ लावू असा इशारा दिला होता. त्यामुळे अनेक देशांनी क्यूबा मदत करण्यापासून काढता पाय घेतला. या परिस्थितीत रशियाने क्यूबाला कच्च्या तेलाचा टँकर पाठवला आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका घेत रशियाने पाठवलेल्या टँकरवर आक्षेप नाही असं विधान केले. 

दरम्यान, या परिस्थितीत रशियन तेल क्युबामध्ये पोहोचले आहे. आपल्या क्युबन मित्रांना मदत करणे हे रशिया आपले कर्तव्य मानतो.पेट्रोलियम उत्पादनांची ही खेप बेटावर पोहोचल्याचा आम्हाला आनंद आहे असं रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले. जानेवारी महिन्यापासून क्युबाला इतका मोठा तेलपुरवठा मिळालेला नाही. क्युबा पूर्वी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करत असे परंतु जानेवारीच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी एका सैन्य कारवाईद्वारे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण घडवून आणले. मादुरो सध्या अमेरिकेच्या ताब्यात असून त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि अमली पदार्थांचे आरोप आहेत. मादुरो यांना हटवल्यानंतर ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या तेलावर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे क्युबाचा व्हेनेझुएलाकडून होणारा तेलपुरवठा खंडित झाला. यामुळे क्युबामध्ये इंधनाच्या किमती वाढल्या आणि दररोज वीजपुरवठा खंडित होऊ लागला.

English
हिंदी सारांश
Web Title : Russia Defies US, Aids Cuba with Oil Amidst Energy Crisis

Web Summary : Despite US threats, Russia sent an oil tanker to Cuba, alleviating its energy crisis. Cuba faced shortages after US sanctions and Venezuelan turmoil. Russia asserts helping Cuba is its duty, criticizing US policies.
टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिकाCrude Oilखनिज तेलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प