शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

घ्या, घ्या रशियन कच्चे तेल घ्या! भारतालाच नाही... इतर देशांनाही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 07:58 IST

Iran War, Russian Oil Sale: इराण-अमेरिका संघर्षामुळे कच्च्या तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने रशियन तेल विक्रीला तात्पुरती मुभा दिली आहे. पहा सविस्तर बातमी.

मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि इराणने दिलेल्या गंभीर इशाऱ्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ रोखण्यासाठी अमेरिकेने अखेर नमते घेत रशियन तेलाच्या विक्रीला तात्पुरती मंजुरी दिली आहे. अमेरिकन ट्रेझरी विभागाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, जहाजांवर आधीच लोड केलेल्या रशियन कच्च्या तेलाच्या व्यवहारांना ११ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भारतासह इतर देशांनाही रशियन कच्चे तेल घेण्यास सांगण्यात आले आहे. 

इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. ऑगस्ट २०२२ नंतर पहिल्यांदाच ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या वर गेले आहेत. ९.२ टक्क्यांच्या वाढीसह ते १००.४६ डॉलर्सवर पोहोचले, तर अमेरिकन बेंचमार्क (WTI) देखील ९५.७३ डॉलर्सवर स्थिरावला आहे.

इराणचा 'होर्मुझ'मधून इशाराइराणच्या 'खातम अल-अनबिया' दलाने स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की, जर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर किंवा बंदरांवर हल्ला झाला, तर संपूर्ण क्षेत्रातील तेल आणि गॅस साठ्यांना आग लावली जाईल. जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग असलेल्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) मधील वाहतूक विस्कळीत झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिकाराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अणू शस्त्रे बनवण्यापासून रोखणे ही आपली प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे. मात्र, तेलाच्या वाढत्या किमती आणि शेअर बाजारातील घसरण पाहता अमेरिकेला धोरणात्मक निर्णय घेणे भाग पडले आहे. ऊर्जेचा पुरवठा खंडित होऊ नये म्हणून रशियन तेलाला दिलेली ही तात्पुरती सवलत जागतिक अर्थव्यवस्थेला दिलासा देण्याचा प्रयत्न मानला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Permits Russian Oil for India, Others Amid Rising Tensions

Web Summary : To curb rising oil prices amidst Middle East tensions, the US temporarily allows Russian oil sales to India and other nations until April 11. Iran's threat to disrupt oil routes adds to global market instability, prompting strategic decisions by the US to ensure energy supply.
टॅग्स :IranइराणrussiaरशियाCrude Oilखनिज तेलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प