विचित्र अपघातात रशियाचे आणीबाणी मंत्री येवगेनि जिनिचेव्ह यांचा मृत्यू, कॅमेरामनला वाचवायला गेले आणि घात झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 16:44 IST2021-09-08T16:29:31+5:302021-09-08T16:44:12+5:30
Yevgeny Jinichev : रशियाचे आणीबाणी मंत्री येवगेनि जिनिचेव्ह यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे.

विचित्र अपघातात रशियाचे आणीबाणी मंत्री येवगेनि जिनिचेव्ह यांचा मृत्यू, कॅमेरामनला वाचवायला गेले आणि घात झाला
मॉस्को - रशियाचे आणीबाणी मंत्री येवगेनि जिनिचेव्ह यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे. त्यांच्या मृत्यूबाबत रशियन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार लष्करी कवायतींदरम्यान, चित्रिकरण करत असलेल्या एका कॅमेरामनला पाण्यात पडण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात जिनिचेव्ह यांचा पाय घसरला आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. (Russian Emergency Situations Minister Yevgeny Jinichev dies in accident )
१८ ऑगस्ट १९६६ रोजी जन्मलेले येवगेनी जिनिचेव हे रशियन राजकारणी आणि लष्करी अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना लष्करामध्ये जनरल रँक देण्यात आली होती. २०१८ पासून ते रशियाचे आणीबाणी मंत्री म्हणून काम पाहत होते. तसेच २०१८ पासून ते रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सदस्यही होते.