शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
2
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
3
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
4
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
5
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
6
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
7
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
8
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
9
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
10
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
12
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
13
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!
14
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
15
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
16
Chenab Railway Bridge: आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन
17
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
18
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन्स दिले...
19
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
20
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...

"युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याचा बदला घेणार रशिया, सध्या...!"; ट्रम्प-पुतिन यांच्यात १ तास १५ मिनिटे फोनवर चर्चा, काय-काय बोलले दोन्ही नेते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:05 IST

ट्रम्प म्हणाले, पुतिन यांनी रशियावरील ड्रोन हल्ल्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली असून, आपण याचे उत्तर देणार असे म्हटल आहे. हा हल्ल्याला 'ऑपरेशन स्पायडरवेब' असे नाव देण्यात आले होते. याअंतर्गत युक्रेनने रशियाच्या चार एअरबेसना लक्ष्य केले होते. 

युक्रेनने रशियाच्या एअरबेसवर हल्ला केल्यानंतर, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन स्वस्थ बसणार नाहीत, हे निश्चित होते. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवरून दीर्घ चर्चा झाली. यावेळी, आपण युक्रेनच्या हल्ल्याचे कठोर प्रत्युत्तर देणार, असे स्पष्ट संकेत पुतिन यांनी दिले आहेत. यासंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, आपण बुधवारी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत सुमारे १ तास १५ मिनिटे फोनवर चर्चा केली. ही चर्चा युक्रेनने रशियाच्या एअरबेसवर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर झाली. महत्वाचे म्हणजे, "चर्चा चांगली झाली, मात्र तत्काळ शांतता येणार नाही," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

हल्ल्याचं उत्तर देणार... - ट्रम्प म्हणाले, पुतिन यांनी रशियावरील ड्रोन हल्ल्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली असून, आपण याचे उत्तर देणार असे म्हटल आहे. हा हल्ल्याला 'ऑपरेशन स्पायडरवेब' असे नाव देण्यात आले होते. याअंतर्गत युक्रेनने रशियाच्या चार एअरबेसना लक्ष्य केले होते. 

इराण अणु करारावर चर्चा - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले, दोन्ही नेत्यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावरही चर्चा केली. पुतिन म्हणाले, आपण या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेत मदत करू शकतो. मात्र इराण जाणूनबुजून निर्णयास विलंब करत आहे. आता लवकरात लवकर स्पष्ट उत्तर देण्याची आवश्यकता आहे.

दोन आठवड्यांतील दुसरी चर्चा -ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील ही दुसरी चर्चा आहे. यापूर्वी १९ मे रोजी दोन्ही नेत्यांनी फोनवरच चर्चा केली होती. रशिया आणि युक्रेनमध्ये शांततेचे प्रयत्न सुरू असले तरी युद्ध थांबण्याची खात्रीशीर आशा नाही. ट्रम्प यांनी पुतिन यांच्या अलीकडील काही कृतींवर नाराजी व्यक्त केली होती आणि म्हटले होते की, "ते पूर्णपणे वेडे झाले आहे." यापूर्वी ट्रम्प यांनी पुतिन यांना युक्रेनियन शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यावरून इशारा दिला होता तसेच "पुतिन आगीशी खेळत आहेत," असे म्हटले होते.

माध्यमांतील वृत्तानुसार, युक्रेनियन ड्रोन हल्ल्यात ४१ रशियन बॉम्बर विमाने नष्ट झाली आहेत. याशिवाय, क्रिमिया ब्रिजलाही लक्ष्य करण्यात आले आहे. हा हल्ला रशियाने अत्यंत गांभीर्याने घेतला असून निर्णायक प्रत्युत्तर देण्याचा इशाराही दिला आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पEnglandइंग्लंडAmericaअमेरिकाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया