"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:52 IST2025-06-21T13:51:30+5:302025-06-21T13:52:08+5:30

पुतिन म्हणाले, "आमच्याकडे एक म्हण प्रसिद्ध आहे, जेथे रशियन सैनिकांचा पाय पडतो, ते आमचे असते."

Russia ukraine war news All of Ukraine is ours Putin claims Zelensky's entire country This is the answer he got | "संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

मॉस्को : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी एक मोठे विधान करत संपूर्ण युक्रेनवरच दावा ठोकला आहे. सेंट पीटर्सबर्ग येथे रशियाच्या एका मुख्य आर्थिक व्यासपीठावरून बोलताना, रशियन आणि युक्रेनियन 'एकच लोक' आहेत. या अर्थाने 'संपूर्ण युक्रेन आमचा आहे,' असे व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. याचबरोबर, रशियन सैन्य युक्रेनमधील सुमी शहराचा ताबा घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही. असेही पुतीन म्हणाले. यावर युक्रेनने पुतीन यांच्या या विधानाचा निषेध केला असून, हा पुतीन यांचा वेडेपणा असल्याचे म्हटले आहे.

पुतिन म्हणाले, "आमच्याकडे एक म्हण प्रसिद्ध आहे, जेथे रशियन सैनिकांचा पाय पडतो, ते आमचे असते." युक्रेनवरील आपली भूमिका स्पष्ट करताना, रशियन अध्यक्ष पुतीन म्हणाले, "रशियाने युक्रेनच्या सार्वभौमत्वाच्या अधिकारावर कधीही शंका उपस्थित नाही. मात्र, युक्रेनने १९९१ मध्ये तटस्थ राज्य म्हणून स्वातंत्र्य घोषित केले होते. रशियन सैन्य रशियन भूभागावरील हल्ले रोखण्यासाठी युक्रेनच्या ईशान्य सुमी प्रदेशात बफर झोन तयार करत आहे." महत्वाचे म्हणजे, रशियन सैन्य सुमी शहरावर ताब्या घेण्यासंदर्भातील शक्यताही त्यांनी नाकारली नाही.

यावेळी, आपल्या मागणीचा पुनरुच्चार करत पुतीन पुढे म्हणाले, "कीवने मॉस्कोच्या प्रादेशिक लाभांची वास्तविकता स्वीकारावी आणि नाटोमध्ये सहभागी होण्याचा विचार सोडून द्यावा. आम्ही युक्रेनच्या आत्मसमर्पणाची मागणी करत नाही. मात्र, त्यांनी जमिनीवरील वास्तव ओळखावे. मॉस्कोने अनेक वेळा कीवला समेटाचे आवाहन केले आहे.

...हा पुतीन यांचा वेडेपणा -
युक्रेनच्या परराष्ट्रमंत्री अँड्री सिबिगा यांनी पुतीन यांच्यासंदर्भात भाष्यक करत, पुतीन यांचे विधान म्हणजे, 'वेडेपणा' असून रशियाविरोधात कठोर प्रतिबंध लादण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे, "रशियाला शांततेसाठी भाग पाडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, शिक्षेपासून वाचण्याची भावना नष्ट करणे.'

Web Title: Russia ukraine war news All of Ukraine is ours Putin claims Zelensky's entire country This is the answer he got

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.