तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:32 IST2025-06-02T17:31:34+5:302025-06-02T17:32:17+5:30

Russia Ukraine War: युक्रेनने केलेला हा हल्ला २०२२ नंतरचा आतापर्यंतचा सर्वात घातक हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या ४०-४२ हजार रुपयांच्या ड्रोननी रशियाची सुमारे ५६ हजार करोड रुपयांची लढाऊ विमाने उध्वस्त केली आहेत.

Russia Ukraine War: massive drone attack will force Russia to negotiate; why the attack a day before the peace meeting? Zelensky said... | तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  

तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  

रशियाने युक्रेनवर अण्वस्त्राएवढ्याच शक्तीशाली क्षेपणास्त्राने हल्ला करण्याची तयारी सुरु केली आहे. युक्रेनने रशियावर मोठा ड्रोन हल्ला केला आहे, यात पाच एअरबेसवरील सुमारे ४१ हून अधिक लढाऊ विमाने उध्वस्त केली आहेत. या हल्ल्याला दुसऱ्या महायुद्धावेळी पर्ल हार्बरवर झालेल्या हल्ल्याशी तुलना करून पाहिले जात आहे. यामुळे युक्रेनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना रशिया या हल्ल्यानंतर रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल असे वाटत आहे. 

युक्रेनने केलेला हा हल्ला २०२२ नंतरचा आतापर्यंतचा सर्वात घातक हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या ४०-४२ हजार रुपयांच्या ड्रोननी रशियाची सुमारे ५६ हजार करोड रुपयांची लढाऊ विमाने उध्वस्त केली आहेत. दोन्ही देशांदरम्यान होऊ घातलेल्या शांतता चर्चेच्या एक दिवस आधी हा हल्ला करण्यात आला आहे. 

रशिया-युक्रेन दोन्ही देशांचे अधिकारी आज म्हणजेच सोमवारी तुर्कीची राजधानी इस्तंबूल येथे चर्चा करणार होते. आम्ही केलेला रशियाच्या विमानांवरील हल्ला हा रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. 

रशियासोबतची ही बैठक होणार की नाही अद्याप काहीच खुलासा झालेला नाही. परंतू झेलेन्स्की यांनी लिथुआनियामध्ये झालेल्या नाटो नेत्यांच्या बैठकीत आपण शांततेसाठी आवश्यक पाऊले उचलण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. परंतू जर रशियाने इस्तंबूलमध्ये होणाऱ्या चर्चेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आणि जर ही चर्चा निष्फळ ठरली तर त्यांच्यावर तातडीने नवीन निर्बंध लादण्याची गरज असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. 

रशियाला जेव्हा समजेल की युद्धात त्यांचे मोठे नुकसान होत आहे, तेव्हाच ते शांतता आणि कराराकडे वाटचाल करतील. युद्धविराम, मानवतावादी मदत, कैद्यांची सुटका आणि अपहरण केलेल्या मुलांची घरवापसी याने ही शांततेची सुरुवात व्हायला हवी. रशियाने या गोष्टींना नकार दिला तर अधिकचे निर्बंध लादावेत, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

Web Title: Russia Ukraine War: massive drone attack will force Russia to negotiate; why the attack a day before the peace meeting? Zelensky said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.