शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

Russia Ukraine War: युक्रेननंतर आता हा देश पुतीन यांच्या निशाण्यावर, रशियन सैन्य करू शकते हल्ला, गुप्तचर यंत्रणांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2022 9:55 AM

Russia Ukraine War: रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर सुरू झालेले युद्ध जवळपास दोन महिन्यानंतरही सुरू आहे. या युद्धात United Kingdom युक्रेनला मदत करत आहे. यादरम्यान, युनायटेड किंग्डमच्या गुप्तचर यंत्रणेने एक धक्कादायक दावा केला आहे.

लंडन - रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर सुरू झालेले युद्ध जवळपास दोन महिन्यानंतरही सुरू आहे. या युद्धात युनायटेड किंग्डम युक्रेनला मदत करत आहे. यादरम्यान, युनायटेड किंग्डमच्या गुप्तचर यंत्रणेने एक धक्कादायक दावा केला आहे. युनायटेड किंग्डमने युक्रेनला पाठिंबा दिल्याने रशिया नाराज झाला असून, त्याचा बदल घेण्यासाठी रशियाचे सैन्य युनायटेड किंग्डमवर हल्ला करू शकते. असा दावा या गुप्तचर यंत्रणांनी केला आहे.

द सन मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार ब्रिटनच्या काउंटर इंटेलिजन्स आणि संरक्षण एजन्सी एमआय५ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी होम सेक्रेटरी प्रीती पटेल आणि त्यांच्या टीमला रशियन सैन्याच्या हल्ल्याबाबतच्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि चीफ ऑफ स्टाफ स्टीव्ह बार्कले यांनाही त्यासंदर्भातील सूचना देण्यात आली आहे.

दरम्यान, गुप्तचर यंत्रणांनी दावा केला की, रशियाचे सैन्य युनायटेड किंग्डमचा बदला घेण्यासाठी हल्ला करू शकते. युनायटेड किंग्डमच्या गुप्तचर एजन्सी अलर्टवर आहेत. युनायटेड किंग्डमला अपमानित करण्यासाठी हा हल्ला केला जाऊ शकतो.

रशिया आणि युनायटेड किंग्डम यांच्यात सुरू असलेल्या युद्धामध्ये युनायटेड किंग्डम युक्रेनला साथ देत आहे. युनायटेड किंग्डमने युक्रेनच्या मदतीसाठी हत्यारे पाठवली आहेत. त्यामुळे रशिया नाराज आहे. हल्लीच युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युद्धात युक्रेनचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई रशियाकडून केली गेली पाहिजे, असे विधान केले होते.  युक्रेननेही युनायटेड किंग्डमकडून आलेल्या मदतीचे कौतुक केले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी पुतीन यांचं सैन्य युनायटेड किंग्डमवर हल्ला करू शकते, असा दावा केला आहे.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाEnglandइंग्लंड