युद्ध सुरु असतानाच रशिया-युक्रेन यांच्या महत्त्वाचा करार, युएईने केलेल्या मध्यस्थीचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 14:33 IST2024-01-04T14:27:48+5:302024-01-04T14:33:22+5:30
यूएईने दोन्ही देशांदरम्यान एक मोठा करार केला

युद्ध सुरु असतानाच रशिया-युक्रेन यांच्या महत्त्वाचा करार, युएईने केलेल्या मध्यस्थीचे कौतुक
Russia Ukraine War, UAE : रशिया-युक्रेन यांच्यात अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू झाल्यापासून जवळपास प्रत्येक देशाने दोन्ही देशांत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशांतील परिस्थिती बिकट आहे. यादरम्यान, यूएईने दोन्ही देशांदरम्यान एक मोठा करार केला असून, त्याअंतर्गत दोन्ही देशांचे शेकडो सैनिक दीर्घ कालावधीनंतर मायदेशी परतले आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये सलग २३ महिने युद्ध सुरू आहे. यामध्ये दोन्ही देशांच्या हजारो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सामान्य नागरिकांनीही या युद्धात लहान मुले आणि महिलांसह अनेक प्रियजनांना गमावले. असे असूनही हे युद्ध थांबलेले नाही. अनेक देशांनी प्रयत्न केले, पण रशिया-युक्रेन युद्ध कोणीही रोखू शकले नाही. पण दरम्यान, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE ने ते केले आहे जे आजपर्यंत कोणताही देश करू शकला नाही. युएईने रशिया आणि युक्रेन यांच्यात महत्त्वपूर्ण करार केला आहे. या करारानुसार दोन्ही देशांचे शेकडो सैनिक प्रदीर्घ काळानंतर मायदेशी परतले आहेत.
करार कसा झाला?
रशिया आणि युक्रेन यांनी बुधवारी संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्थीने करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार शेकडो युद्धकैद्यांची देवाणघेवाण झाली. युक्रेनियन अधिकार्यांनी कबूल केले की युएईने मध्यस्थी केलेल्या मोठ्या करारानंतर २३० युक्रेनियन युद्धकैदी रशियामधून मायदेशी परतले आहेत. त्याच वेळी रशियाच्या सुमारे २४८ सैनिकांनाही युक्रेनच्या कैदेतून मुक्तता मिळाली आहे. मायदेशी परतणाऱ्या सैनिकांनी यूएईचे आभार मानले आहेत. इतक्या दिवसांनी आपल्या लोकांना पाहून दोन्ही देशांच्या युद्धकैद्यांना आनंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.