Russia-Ukraine: एकीकडे इराण-इस्रायल आणि अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा युद्धाची ठिणगी पेटली आहे. ताज्या माहितीनुसार, युक्रेनकडून रशियातील तेल रिफायनरी आणि तेल निर्यात टर्मिनलवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्यात आले असून, यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
रशियाच्या ऊर्जा उद्योगाला लक्ष्य
युक्रेनने गेल्या काही दिवसांत रशियातील अनेक तेल रिफायनरी आणि एक्सपोर्ट टर्मिनलवर ड्रोन हल्ले केले आहेत. युक्रेनच्या लष्करानुसार, हे हल्ले गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या मोहिमेचा भाग आहेत. या रणनीतीचा उद्देश रशियाच्या युद्धासाठी लागणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम करणे हा आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, युक्रेनचे लाँग-रेंज ड्रोन आता अधिक प्रभावी झाले असून, या महिन्यात रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर किमान 10 मोठे हल्ले करण्यात आले आहेत.
मोठ्या तेल रिफायनरीवर ड्रोन हल्ला
रशियाच्या यारोस्लाव प्रदेशातील एका मोठ्या तेल रिफायनरीवर नुकताच ड्रोन हल्ला झाला, ज्यामुळे तिथे आग लागली. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार 30 पेक्षा जास्त ड्रोन मार्गातच पाडण्यात आले, मात्र काही इमारती आणि व्यावसायिक सुविधांचे नुकसान झाले. तसेच बाल्टिक समुद्र किनाऱ्यावर असलेल्या रशियाच्या उस्त-लुगा तेल टर्मिनलवरही गेल्या आठवड्यात दोन वेळा हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये तेल लोडिंग स्टेशन आणि स्टोरेज टँकचे नुकसान झाले. हल्ल्यानंतर सेंट पीटर्सबर्ग परिसरात वायू प्रदूषणाचा इशाराही देण्यात आला.
रिफायनरी क्षमता घटल्याचा दावा
युक्रेनचा दावा आहे की, या हल्ल्यांमुळे उस्त-लुगा टर्मिनलची क्षमता सुमारे 40 टक्क्यांनी कमी झाली आहे. याशिवाय प्रिमोर्स्क बंदर आणि सारातोव येथील रिफायनरीलाही लक्ष्य करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, मिडल ईस्टमधील तणावामुळे तेलाच्या किंमती वाढत असताना रशियाला त्याचा फायदा होत होता, मात्र युक्रेन या हल्ल्यांद्वारे तो फायदा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
रशियाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता
रशियाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा तेल निर्यातीवर अवलंबून आहे. रशियाच्या एकूण महसुलातील सुमारे एक-तृतीयांश महसूल तेल उद्योगातून येतो. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यांचा थेट परिणाम रशियाच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर रशिया देशांतर्गत गरजा लक्षात घेऊन पेट्रोल निर्यातीवर पुन्हा निर्बंध घालण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे.
Web Summary : Ukraine's drone attacks on Russian oil refineries escalate amid global energy concerns. Zelensky claims increased drone effectiveness, targeting Russia's energy infrastructure. These attacks aim to cripple Russia's war economy by disrupting oil exports, impacting its revenue.
Web Summary : वैश्विक ऊर्जा संकट के बीच यूक्रेन के रूसी तेल रिफाइनरियों पर ड्रोन हमले तेज। ज़ेलेंस्की का दावा है कि ड्रोन की प्रभावशीलता बढ़ी, रूस के ऊर्जा बुनियादी ढांचे को निशाना बनाया गया। इन हमलों का उद्देश्य तेल निर्यात को बाधित करके रूस की युद्ध अर्थव्यवस्था को पंगु बनाना है, जिससे उसके राजस्व पर असर पड़ेगा।