Russia Ukraine Crisis: पुढील काही दिवसांत मोठी घटना घडणार; अमेरिकेने लोकांना केले सतर्क, यूक्रेन सोडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 02:47 PM2022-02-11T14:47:07+5:302022-02-11T14:58:59+5:30

अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी या लढाईत यूक्रेनची साथ देणार असल्याचं म्हटलं आहे तर चीननं रशियाची बाजू उचलून धरली आहे.

Russia Ukraine Crisis: Biden warns American citizens in Ukraine to 'leave now' | Russia Ukraine Crisis: पुढील काही दिवसांत मोठी घटना घडणार; अमेरिकेने लोकांना केले सतर्क, यूक्रेन सोडण्याचे आदेश

Russia Ukraine Crisis: पुढील काही दिवसांत मोठी घटना घडणार; अमेरिकेने लोकांना केले सतर्क, यूक्रेन सोडण्याचे आदेश

googlenewsNext

वॉश्गिंटन – रशिया आणि यूक्रेन(Russia Ukraine Dispute) यांच्या दरम्यान युद्ध टाळण्याचे प्रयत्न अयशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळेच अमेरिकेने यूक्रेनमधील त्यांच्या नागरिकांना तातडीनं देश सोडून जाण्याचे आदेश दिलेत. सध्याच्या परिस्थितीत पुढील काही दिवसांत मोठं काहीतरी घडण्याची शक्यता आहे. जर दोन्ही देशात युद्ध झालं तर केवळ या दोन्ही देशाचा तो प्रश्न नाही तर यामुळे विश्वयुद्ध होण्याचीही भीती वर्तवण्यात येत आहे.

अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी या लढाईत यूक्रेनची साथ देणार असल्याचं म्हटलं आहे तर चीननं रशियाची बाजू उचलून धरली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन(Joe Biden) यांनी रशियाच्या हल्ल्याची शक्यता पाहता यूक्रेनमधून नागरिकांना मायदेशी परतण्याच्या सूचना केल्या आहेत. न्यूज एजेन्सी AFP नुसार, बायडन यांनी सांगितले की, अमेरिकेच्या नागरिकांनी लवकरात लवकर यूक्रेन सोडावं. यूक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्याचा धोका पाहता अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी यूक्रेनमधील लोकांना आवाहन केले आहे.

विशेष म्हणजे, यूक्रेनवर हल्ला केल्यास रशियाला किंमत मोजावी लागेल असा इशाराही अमेरिकेनं दिला आहे. परंतु त्याचाही रशियावर कुठलाच परिणाम झाला नाही.तर दुसरीकडे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी गुरुवारी सांगितले की, यूक्रेन संकट मागील काही दशकांपासून सर्वाधिक धोकादायक क्षणात प्रवेश करणार आहे. ब्रिटनच्या सर्वोच्च राजनयिकाने तिच्या रशियन दूतांशी देखील चर्चा केली आहे.

ब्रिटीश सैनिक पोलँडला पोहचले

यूक्रेनच्या उत्तरकडे बेलारुसमध्ये रशियन सैनिकांची हालचाल सुरु झाली आहे. यूक्रेनच्या सीमेजवळ रशियाचे १ लाखाहून अधिक सैनिक दाखल झाले आहेत. गुरुवारी ब्रिटीश रॉयल एअर फोर्सनं एक लढाऊ विमानासह ३५० सैनिकांना पोलँडमध्ये उतरवलं आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियावर दबाव वाढवण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. परंतु मॉस्कोच्या भूमिकेत कुठलाही बदल न झाल्याचं दिसून येत आहे.

रशियाच्या हल्ल्याचा सीक्रेट प्लॅनलीक

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन(Vladimir Putin) यूक्रेनबाबत कुठल्याही दबावाला झुकण्यास तयार नाहीत. दुसरीकडे यूक्रेनमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वात नाटो संघानं तैनात केलेल्या सैन्याची संख्या वाढवली आहे. रशियाच्या चहुबाजूने नाटो समर्थित देशांचे सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. त्यानंतर रशियानं आमच्या ताकदीला आव्हान न देण्याचा इशारा दिला आहे. जर्मन मीडिया रिपोर्टनुसार, यूक्रेनवर रशियन हल्ल्याच्या योजनेचा खळबळजनक दावा केला आहे. यूक्रेनवर हल्ला करण्याचा रशियाचा प्लॅन पूर्ण तयार आहे. एका परदेशी सीक्रेट सर्व्हिसच्या हवाल्याने हा रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी ३ टप्प्यातील योजनेचा आराखडा सांगण्यात आला आहे. या हल्ल्याचं नेतृत्व मॉस्कोच्या हातात आहे.

Web Title: Russia Ukraine Crisis: Biden warns American citizens in Ukraine to 'leave now'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.