मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 16:51 IST2026-04-10T16:49:57+5:302026-04-10T16:51:48+5:30

Russia Ukraine Ceasefire News : रशिया आणि युक्रेनमध्ये ऑर्थोडॉक्स इस्टरनिमित्त ३२ तासांच्या युद्धविरामाची घोषणा. पुतिन यांचा निर्णय आणि झेलेन्स्की यांचा प्रतिसाद.

Russia Ukraine Ceasefire News: Big but unexpected development! Ceasefire in Russia-Ukraine; Putin approves, for 32 hours... | मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...

मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...

गेल्या चार वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात आज एक अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक घडामोडी पाहायला मिळाली आहे. रशियाने 'ऑर्थोडॉक्स इस्टर'चे औचित्य साधत युक्रेनसोबत ३२ तासांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत युद्धविरामाचे पालन करण्याचे संकेत दिले आहेत. या ३२ तासांच्या अल्पशा विश्रांतीमुळे भविष्यात दीर्घकालीन शांतता करारासाठी दरवाजे उघडू शकणार आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी रात्री उशिरा या युद्धविरामाचा आदेश दिला. यानुसार, शनिवारी (११ एप्रिल) दुपारी ४:०० वाजल्यापासून ते रविवार (१२ एप्रिल) मध्यरात्रीपर्यंत रशियन सैन्याकडून कोणतेही हल्ले केले जाणार नाहीत. ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन समुदायासाठी इस्टर हा अत्यंत पवित्र सण असल्याने, नागरिकांना शांततेत प्रार्थना करता यावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे क्रेमलिनने म्हटले आहे.

अमेरिकेकडून मध्यस्थीचे प्रयत्न?
हा युद्धविराम केवळ धार्मिक कारणास्तव नसून, त्यामागे मोठ्या राजनैतिक हालचाली असल्याचे समजते. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर, रशिया-युक्रेन वादातही तोडगा काढण्यासाठी अमेरिकेकडून पडद्यामागून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. झेलेन्स्की यांनीही यापूर्वी अमेरिकेमार्फत रशियाला इस्टरच्या निमित्ताने युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव दिला होता, ज्याला आता यश येताना दिसत आहे.

युद्धविरामाचा परिणाम काय होणार?
नागरिकांना दिलासा: युद्धाच्या झळा सोसणाऱ्या सीमावर्ती भागातील नागरिकांना दोन दिवस शांततेत सण साजरा करता येईल.
शांतता चर्चेची आशा: या ३२ तासांच्या अल्पशा विश्रांतीमुळे भविष्यात दीर्घकालीन शांतता करारासाठी दरवाजे उघडू शकतात.
जागतिक परिणाम: इराण-अमेरिका यांच्यातील तणाव कमी होत असतानाच रशियाने घेतलेली ही मवाळ भूमिका जागतिक अर्थव्यवस्थेसाठी, विशेषतः इंधन दरांसाठी दिलासादायक ठरू शकते.

Web Title : रूस-यूक्रेन युद्धविराम: पुतिन ने 32 घंटे के लिए संघर्ष विराम को मंजूरी दी

Web Summary : रूस ने ऑर्थोडॉक्स ईस्टर के लिए यूक्रेन के साथ 32 घंटे के युद्धविराम की घोषणा की। जेलेंस्की की सकारात्मक प्रतिक्रिया के बाद पुतिन के आदेश का उद्देश्य शांतिपूर्ण उत्सवों की अनुमति देना है। अमेरिकी-ईरान वार्ता के बीच, यह कदम व्यापक शांति वार्ता और वैश्विक आर्थिक राहत की उम्मीद जगाता है।

Web Title : Russia-Ukraine Ceasefire: Putin Approves 32-Hour Truce Amid Diplomatic Efforts

Web Summary : In a significant development, Russia declared a 32-hour ceasefire with Ukraine for Orthodox Easter. Putin's order, following Zelensky's positive response, aims to allow peaceful celebrations. Amid US-Iran talks, this move sparks hope for broader peace negotiations and global economic relief.