इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 19:35 IST2026-04-12T19:33:25+5:302026-04-12T19:35:06+5:30

इस्लामाबादमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर युद्ध पुन्हा सुरू होईल का अशी भीती अनेक देशांना आहे. त्यातच पुतिन यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पझेश्कियान यांना फोन केला

Russia President Vladimir Putin has offered to help mediate peace in the Middle East, Called Iran President after US talks failed | इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर

इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर

तेहरान - इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम झाला असला तरी मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. पाकिस्तानमधील शांतता चर्चा फिस्कटल्याने हा तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यातच जागतिक राजकारणात नवी उलथापालथ समोर आली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी इराणचे राष्ट्रपती मसूद पझेश्कियान यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि शांततेसाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला. पुतिन यांनी या संघर्षावर राजकीय आणि राजनैतिक तोडगा काढण्यास मदत करायला तयार आहे आणि या प्रदेशात कायमस्वरुपी शांतता नांदावी अशी इच्छा असल्याचं स्पष्टपणे सांगितले.

अमेरिका आणि इराण यांच्यातील इस्लामाबादमधील शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे. पाकिस्तानमध्ये २१ तास चाललेल्या वाटाघाटींनंतरही कोणताही करार या दोन्ही देशांमध्ये होऊ शकला नाही. परंतु चर्चा फिस्कटली तरीही दोन्ही देशांनी युद्धविरामाचं उल्लंघन केले नाही ही दिलासादायक बाब आहे. इस्लामाबादच्या अयशस्वी चर्चेमुळे जगभरात चिंता वाढली आहे. जर संघर्ष पुन्हा सुरू झाला तर त्याचा थेट परिणाम जागतिक तेल बाजारावर होऊ शकतो. आखाती प्रदेशातील तेल आणि गॅस सुविधांनाही धोका निर्माण होऊ शकतो आणि ऊर्जेच्या किमती गगनाला भिडू शकतात.

व्लादिमीर पुतिन यांची ऑफर

इस्लामाबादमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर युद्ध पुन्हा सुरू होईल का अशी भीती अनेक देशांना आहे. त्यातच पुतिन यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पझेश्कियान यांना फोन केला आणि परिस्थितीची माहिती करून घेतली. त्यानंतर त्यांनी या संघर्षावर राजनैतिक आणि राजकीय तोडगा काढण्याचा प्रस्ताव इराणला दिला. व्लादिमीर पुतिन यांनी यापूर्वीही या मुद्द्यावर मध्यस्थीची चर्चा केली होती. इतकेच नव्हे तर संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी ट्रम्प यांच्याशीही संवाद साधला होता.

जे.डी व्हान्स अमेरिकेत परतले

अमेरिकेच्या वतीने शांतता चर्चेत नेतृत्व करणारे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स पाकिस्तानहून अमेरिकेत परतले आहेत. अमेरिकेने इराणला आपला अंतिम आणि सर्वोत्तम प्रस्ताव दिला आहे असं त्यांनी निघताना इराणला बजावले. आता फैसला इराणच्या हाती असून ते निर्णय स्वीकारतात की नाही त्यांच्यावर अवलंबून आहे असं व्हान्स यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे इराणनेही अनेक सकारात्मक प्रस्ताव बैठकीत सादर केले, परंतु अमेरिकेवर त्यांचा भरवसा नाही असं संसद अध्यक्ष कलिबाफ यांनी म्हटलं. मात्र या चर्चेनंतर दोन्ही बाजूनेही कुठलाही हल्ला झाला नाही हे सकारात्मक चित्र आहे. त्यामुळे पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title : अमेरिका-ईरान संघर्ष में पुतिन की मध्यस्थता की पेशकश, वार्ता विफल

Web Summary : तनाव बढ़ने के बीच, पाकिस्तान में अमेरिका-ईरान वार्ता विफल होने के बाद पुतिन ने ईरान को मध्यस्थता की पेशकश की। उन्होंने स्थायी शांति के लिए एक राजनीतिक समाधान खोजने की तत्परता व्यक्त की। अमेरिका ने अपना अंतिम प्रस्ताव पेश कर दिया है, और निर्णय ईरान पर छोड़ दिया है।

Web Title : Putin Offers Mediation in US-Iran Conflict After Failed Talks

Web Summary : Amidst rising tensions, Putin offered Iran mediation after US-Iran talks in Pakistan failed. He expressed readiness to find a political solution for lasting peace. The US has presented its final proposal, leaving the decision to Iran.