रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 17:03 IST2025-05-25T16:52:01+5:302025-05-25T17:03:23+5:30
रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. हा रशियाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचा दावा केला जात आहे.

रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
गेल्या काही वर्षापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने आज पुन्हा एकदा युक्रेनवर हल्ला केला आहे. हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे. रशियाने युक्रेनवर ३६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. या हल्ल्यात किमान १३ जणांचा मृत्यू झाला आहे, यात तीन मुलांचा समावेश आहे. तर बारा जण जखमी झाले आहेत.
युक्रेनच्या हवाई दलाने २६६ रशियन ड्रोन आणि ४५ क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा युक्रेनने केला. या हल्ल्यात अपार्टमेंट आणि इमारतींचे नुकसान झाले.
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
दक्षिण युक्रेनमधील मायकोलाईव्ह येथे रशियन ड्रोन हल्ल्यात ७७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याशिवाय, एका अपार्टमेंटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इमारतीभोवती सर्वत्र कचरा पडला आहे. या हल्ल्यानंतर व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा अमेरिकेवर निशाणा साधला आहे. यासाठी डोनाल्ड ट्रम्प जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
झेलेन्स्की म्हणाले की, अमेरिका आणि जगाचे मौन व्लादिमीर पुतिन यांना प्रोत्साहन देत आहे. रशिया युक्रेनवर दहशतवादी हल्ले करत आहे. दबावाशिवाय काहीही बदलणार नाही. रशिया आणि त्यांचे मित्र राष्ट्रे पाश्चात्य देशांमध्ये उद्वस्त करत राहतील.
रशियाने युक्रेनचे ९५ ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. यापैकी १२ मॉस्कोजवळ रोखण्यात आले. रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांमध्ये तुर्कीये येथे शांतता चर्चा झाली. दोन तासांपेक्षा कमी काळ चाललेल्या या चर्चेत कोणताही तोडगा निघू शकला नाही. युक्रेनला रशियाने किमान एक महिन्याच्या युद्धबंदीवर सहमती द्यावी अशी इच्छा होती. तर रशिया युद्धबंदीसाठी तयार नव्हता. दोन्ही देशांमध्ये १००० कैद्यांच्या सुटकेसाठी करार झाला.