वॉशिंग्टन/मॉस्को: जागतिक राजकारणात खळबळ उडवणारी एक मोठी माहिती समोर येत आहे. रशिया आता इराणला महत्त्वाची गुप्त माहिती पुरवत असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे. या माहितीचा वापर करून इराणचे समर्थक गट मध्यपूर्वेतील अमेरिकन आणि इस्रायली सैन्याला लक्ष्य करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या नव्या घडामोडींमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
गुप्तचर अहवालानुसार, रशियाने इराणला अशा प्रकारचे तांत्रिक सहाय्य आणि डेटा पुरवण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे होईल. रशिया आणि इराणमधील वाढती जवळीक ही केवळ शस्त्रास्त्रांपुरती मर्यादित नसून, ती आता 'इंटेलिजन्स शेअरिंग'पर्यंत पोहोचली आहे. विशेषतः इस्रायल आणि हमास-हिजबुल्ला यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल अत्यंत घातक मानले जात आहे.
ट्रम्प प्रशासनाने मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्याऐवजी वाढविला आहे. युक्रेन युद्धात अमेरिका थेट नाही परंतू शस्त्रास्त्रे पुरवून रशियाविरोधात झुंज सुरु ठेवत आहे. यामुळे रशियाने देखील इराणला मदत करत अमेरिकेचा बदला घेण्यास सुरुवात केली आहे. रशियाच्या या हस्तक्षेपामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. रशियाकडून मिळणाऱ्या सॅटेलाईट डेटाचा वापर करून इराणचे 'प्रॉक्सी' गट (जसे की हुथी बंडखोर किंवा हिजबुल्ला) अमेरिकन जहाजांवर आणि तळांवर अचूक हल्ले करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
जागतिक समीकरणांवर परिणामयुक्रेन युद्धापासून रशिया आणि पाश्चात्य देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. अशातच अमेरिकेला शह देण्यासाठी रशियाने इराणशी हातमिळवणी केल्याचे दिसते. यामुळे आता 'कोल्ड वॉर' सारखी स्थिती निर्माण होत असून, मध्यपूर्वेतील शांतता धोक्यात आली आहे.
Web Summary : Russia is reportedly providing Iran with intelligence, potentially enabling attacks on US and Israeli assets in the Middle East. This escalates regional tensions amid the Ukraine war, as Russia retaliates against US involvement.
Web Summary : रिपोर्ट के अनुसार, रूस ईरान को खुफिया जानकारी दे रहा है, जिससे मध्य पूर्व में अमेरिकी और इजरायली संपत्तियों पर हमले हो सकते हैं। यूक्रेन युद्ध के बीच, रूस अमेरिका की भागीदारी के खिलाफ जवाबी कार्रवाई करते हुए क्षेत्रीय तनाव को बढ़ा रहा है।