Russia: बंडाची घोषणा, मॉस्कोच्या दिशेने कूच, आता वॅगनर ग्रुपने घेतला मोठा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 06:17 AM2023-06-25T06:17:32+5:302023-06-25T07:01:48+5:30

Russia: वॅगनर ग्रुप या प्रायव्हेट आर्मीचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्याकडून करण्यात आलेल्या सशस्त्र बंडानंतर रशियामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत.

Russia: Declaration of rebellion, march towards Moscow, now the Wagner group made a big decision | Russia: बंडाची घोषणा, मॉस्कोच्या दिशेने कूच, आता वॅगनर ग्रुपने घेतला मोठा निर्णय 

Russia: बंडाची घोषणा, मॉस्कोच्या दिशेने कूच, आता वॅगनर ग्रुपने घेतला मोठा निर्णय 

googlenewsNext

 रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात रशियातील वैगनर या खासगी लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांनी पुकारलेले बंड काही तासांमध्येच थंड झाले. आता मॉस्कोकडे जाऊ नये, माघार घ्यावी आणि परत युक्रेनमधील आपल्या कॅम्पमध्ये परतावे, असे आदेश प्रीगोझिन आपल्या खासगी लष्कराला दिले आहेत. रशियात रशियाचे रक्त सांडू नये, यासाठी आपण माघार घेत असल्याचे प्रीगोझिन यांनी म्हटले आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी काल वॅगनर ग्रुप या प्रायव्हेट आर्मीचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्याकडून करण्यात आलेल्या सशस्त्र बंडाच्या घोषणेला विश्वासघात आणि रशियाच्या पाटीत सुरा खुपसणारं पाऊल म्हटलं आहे. तसेच हे कटकारस्थान रचणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, प्रिगोझिन यांच्या सैन्याने युक्रेनची सीमा ओलांडून रशियातील दक्षिणेतील महत्त्वाच्या शहरात प्रवेश केला आहे. तसेच ते मॉस्कोच्या दिशेने कूच करत आहेत. दरम्यान, वॅगनर ग्रुपने मॉस्कोच्या दिशेने कूच करण्याचा निर्णय टाळल्याचे वृत्त आलं आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार संभाव्य रक्तपात टाळण्यासाठी वॅगनर सैन्याने मॉस्कोच्या दिशेने जाणाऱ्या ताफ्याला मागे वळवले आहे. मात्र वॅगनर आर्मीच्या बंडामुळे सुमारे १२ तास रशियासह संपूर्ण जगात खळबळ उडाली होती.

दरम्यान, वॅगनर ग्रुपच्या बंडामुळे नाराज झालेले रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी टेलिव्हिजनवर प्रसारित संबोधनामध्ये देशाच्या संरक्षणाचा संकल्प केला आहे. प्रिगोझिन यांच्या नेतृत्वात झालेलं बंड हे दोन दशकांपासून सत्तेवर असलेल्या व्लादिमीर पुतीन यांच्या नेतृत्वासाठी मोठा धोका असल्याचे बोलले जात आहे. प्रिगोझिन यांच्या बंडामुळे मॉस्कोच्या दिशेने कूच करत असल्याच्या पार्श्वभूमीवर मॉस्कोमध्ये लष्करी वाहने आणि चिलखती वाहनांची वर्दळ वाढली आहे.

अधिकाऱ्यांनी मॉस्को आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रांमध्ये दहशतवादविरोधी कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर सुमारे १६ महिन्यांनी ही नाट्यमय घडामोड घडली आहे. वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर व्लादिमीर पुतीन यांनी प्रीगोझिन यांच नाव न घेता त्यांनी केलेल्या बंडाचा उल्लेख विश्वासघात आणि देशद्रोह असा केला आहे. तर आपले सैनिक हे आत्मसमर्पण करणार नाही. कारण देश भ्रष्टाचार, फसवणूक आणि नोकरशाहीच्या जाळ्यात फसून राहावा, असे आम्हाला वाटत नाही, असे प्रीगोझिन यांनी स्पष्ट केले. तसेच आपल्याकडे २५ हजार सैनिक आहेत. तसेच रशियन सैन्यांने त्यांना विरोध करू नये, असं आवाहनही केलं आहे.   

वाईट कृत्ये करणाऱ्याचा होतो विनाश झेलेन्स्की
जो वाईट कृत्ये करतो. तो स्वतःचा विनाश ओढवून घेतो, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यानी म्हटले आहे. वैगनर यांनी पुतिन यांच्या विरोधात वड पुकारले आहे. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी पुतिन यांना हा टोला लगावला आहे. पुतिन यांच्या राजवटीची वैगुण्ये झाकण्याचा रशियाने नेहमीच प्रयत्न केला. मात्र, पुतिन यांचे पितळ उघडे पडले आहे, असे झेलेन्स्की म्हणाले.

न्यायासाठी संघर्ष : येवगेनी प्रीगोझिन
■ रशियातील लोकांना पुतिन यांची भ्रष्ट व नोकरशहा यांचे वर्चस्व असलेली राजवट नको आहे. त्यामुळे पुतिन यांनी दिलेल्या आदेशाचे वैगनर सैनिक पालन करणार नाहीत, असे खासगी लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यानी ध्वनिफितीद्वारे दिलेल्या संदेशात म्हटले.
■ युक्रेन युद्धामध्ये वॅगनर हे खासगी लष्कर रशियाच्या सैनिकाच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. पण आता युक्रेनमधून वॅगनरने आपले सैनिक माघारी नेले आहेत. आम्ही लष्करी वड केलेले नसून, न्याय मिळविण्यासाठी लढत आहोत, असे येवगेनी प्रीगोझिन यांनी सांगितले होते,

बंडखोरांवर करणार कडक कारवाई
बेंगनर लष्कराने रशियाचा विश्वासघात केला आहे. त्या लष्कराचे प्रमुख प्रीगोझिन यांच्या देशद्रोही कृत्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही, असा इशारा त्यांचे नाव न घेता पुतिन यांनी दिला. दरम्यान, पुतिन यांनी विमानाने मॉस्कोतून पळ काढल्याची चर्चा होती. मात्र, त्याचा सरकारने इन्कार केला आहे. बंडखोरांपासून रशियाचे रक्षण करणारच, असेही सरकारने स्पष्ट केले.

विरोध करणाऱ्यांचा नायनाट करू : वॅगनर
रोस्तोव ऑन दॉन हे शहरातील लष्करी मुख्यालय ताब्यात घेताना कोणीही आम्हाला विरोध केला नाही, असा दावा वैगनर लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांनी केला. आमचे ध्येय गाठताना कोणी विरोध केला तर त्याचा नायनाट करू. आमचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असेही ते म्हणाले. वॅगनर लष्कराच्या युक्रेनमधील तळांवर रशियाच्या हेलिकॉप्टरनी हल्ले चढविले, त्याबद्दल आम्ही रशियाचे सरक्षणमंत्री सेर्गेई शोर्डगू याच्यावर कारवाई करणार आहोत, असेही प्रीगोझीन यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Russia: Declaration of rebellion, march towards Moscow, now the Wagner group made a big decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.