मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 07:56 IST2026-04-10T07:56:46+5:302026-04-10T07:56:56+5:30

Russia Declares Ceasefire Ukraine War: या युद्धविरामाचे युक्रेननेही पालन करावे, असे आवाहन रशियाकडून करण्यात आले आहे.

russia announces ceasefire no attacks on ukraine for two days know what exactly happened suddenly | मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?

मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?

Russia Declares Ceasefire Ukraine War: गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. अद्यापही दोन्ही देशांचे एकमेकांच्या ठिकाणावर हल्ले सुरूच असतात. छोटा देश असून, युक्रेनने कसोशिने रशियाचा प्रतिकार केला. परंतु, यातच आता सुमारे ३२ तासांचा युद्धविराम रशियाकडून जारी करण्यात आला आहे. युक्रेनही याचे पालन करेल, असा विश्वास रशियाने व्यक्त केला आहे. शांततेच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असून, हे युद्ध थांबणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इस्टरच्या निमित्ताने दोन दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. तसेच युक्रेनही त्याचे पालन करेल, अशी आशा व्यक्त केली. यावर्षी रशियात १२ एप्रिल रोजी इस्टर आहे. ११ एप्रिल रोजी आणि १२ एप्रिलच्या सायंकाळपर्यंत युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. युक्रेन रशियन फेडरेशनच्या या आवाहनाचे अनुसरण करेल, या आधारावर आम्ही कार्यवाही करत आहोत, असे रशियाने म्हटले आहे.

सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचे निर्देश

या घोषणेनुसार, संरक्षण मंत्री आंद्रेई बेलौसोव्ह यांनी रशियाचे सर्वोच्च लष्करी कमांडर, चीफ ऑफ द जनरल स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांना या कालावधीत सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. शत्रूकडून होणाऱ्या कोणत्याही संभाव्य चिथावणीला किंवा आक्रमक कारवाईला परतवून लावण्यासाठी लष्करी दल सज्ज असले पाहिजे, असेही आदेश देण्यात आलेले आहेत. रशियाकडून घोषित केलेल्या युद्धविरामाबाबत युक्रेनने अद्याप कोणतीही तात्काळ प्रतिक्रिया आली नाही.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे युक्रेनियन शहरांवर झालेल्या हवाई हल्ल्यांचा हवाला देत आणि रशियाने ड्रोन हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिल्याचे सांगत, आठवड्याभरापेक्षा जास्त काळापासून इस्टरच्या काळात युद्धविरामाचा प्रस्ताव देत आहेत.

 

Web Title : रूस ने यूक्रेन में युद्धविराम की घोषणा की; अचानक क्या हुआ?

Web Summary : रूस ने ईस्टर के लिए 32 घंटे के युद्धविराम की घोषणा की, यूक्रेन से भी ऐसा करने का आग्रह किया। पुतिन ने सेना को अभियान रोकने का निर्देश दिया, लेकिन उकसावों के लिए तैयार रहने को कहा। यूक्रेन ने प्रतिक्रिया नहीं दी है, जबकि ज़ेलेंस्की ने पहले हमलों के बीच ईस्टर युद्धविराम का प्रस्ताव रखा था।

Web Title : Russia Announces Ceasefire in Ukraine; What Prompted This Sudden Move?

Web Summary : Russia declared a 32-hour ceasefire for Easter, urging Ukraine to follow. Putin instructed forces to halt operations but remain prepared for provocations. Ukraine hasn't responded, while Zelenskyy previously proposed an Easter truce amidst ongoing attacks.