शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

अंटार्टिकावरील गुरुत्वाकर्षण क्षमतेला धोका

By admin | Published: May 26, 2015 11:50 PM

अंटार्टिकावरील बर्फाचा थर झपाट्याने कमी होत असून, हा थर कमी होण्याचे परिणाम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षमतेवरही होतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

न्यूयॉर्क : अंटार्टिकावरील बर्फाचा थर झपाट्याने कमी होत असून, हा थर कमी होण्याचे परिणाम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षमतेवरही होतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. अंटार्टिकाच्या दक्षिण भागावर पृथ्वीच्या तापमानवाढीचा परिणाम फारसा होत नाही असे मानले जात असे. या समजाला पहिला धक्का बसला २००९ साली. त्यावेळी अनेक हिमनद्या (७५० कि.मी. लांबी) अचानक बर्फाचे थर समुद्रात लोटू लागल्या. सायन्स या विज्ञानविषयक नियतकालिकात ही आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. समुद्रात बर्फाचे थर लोटले गेल्यामुळे समुद्राचे पाणी ३०० क्युबिक कि.मी.ने वाढले. असे संशोधक डॉ. बर्ट वौटर्स यांनी म्हटले आहे. वौटर्स हे ब्रिस्टॉल येथील मेरी क्युरी विद्यापीठाचे फेलो आहेत. युरोपियन अवकाश संस्थेने बर्फाचे थर मोजण्यासाठी अवकाशात प्रक्षेपित केलेल्या क्रायोसॅट-२ या अवकाश यानाच्या साहाय्याने हे बदल मोजण्यात आले आहेत. गेली ५ वर्षे मिळालेल्या माहितीवरून काही हिमनद्यांवरील बर्फाचा थर सातत्याने कमी होत आहे. दरवर्षी तो ४ मीटरने कमी होतो. हा बर्फ नाहीसा होणे नाट्यमय असून त्याचा परिणाम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर होणार हे स्पष्ट आहे. या गतीने बर्फ नाहीसा होत असेल, तर येत्या काही वर्षात हा थर पूर्णपणे नाहीसा होईल असे दिसत आहे. ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड क्लायमेट एक्सपिरीमेंट या उपग्रहाने गुरुत्वाकर्षणात होणाऱ्या बदलांची माहिती दिली आहे. (वृत्तसंस्था)४दक्षिण अंटार्टिकामधील अनेक हिमनद्या आपले बर्फाचे थर समुद्रात लोटत असून, हे थर समुद्रात साचत जातात. परिणामी नवे थर सामावून घेतले जात नाहीत. हवामान बदल व ओझोनचा थर पातळ झाल्याने अंटार्टिकावर वाहणारे वेस्टर्ली विंड्स नावाचे वारे अधिक प्रबळ झाले आहेत. ४या वाऱ्यामुळे समुद्राचे उष्ण पाणी पृथ्वीच्या ध्रुवाकडे फेकले जाते. या पाण्यामुळे बर्फाचे थर वितळतात व नव्या थरांना जागा होते. या घटनाक्रमामुळे अंटार्टिकावरील एक पंचमांश जाडीचा बर्फथर नष्ट झाला आहे, त्यामुळे हिमनद्यांची प्रतिकार क्षमताही कमी झाली आहे.