वैद्यकीय क्षेत्रात क्रांती! एआय काही सेकंदात तयार करेल MRI रिपोर्ट, रुग्णांचे प्राण वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:02 IST2026-02-13T09:01:57+5:302026-02-13T09:02:55+5:30

विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात रुग्णालयांमध्ये जिथे तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता कमी असते, तिथे हे तंत्रज्ञान वेळेवर उपचार मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

Revolution in the medical field! AI will create MRI reports in seconds, saving patients' lives | वैद्यकीय क्षेत्रात क्रांती! एआय काही सेकंदात तयार करेल MRI रिपोर्ट, रुग्णांचे प्राण वाचणार

वैद्यकीय क्षेत्रात क्रांती! एआय काही सेकंदात तयार करेल MRI रिपोर्ट, रुग्णांचे प्राण वाचणार

मिशिगन : वैद्यकीय क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) ने एक मोठी झेप घेतली आहे. मिशिगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी ‘प्राइमा’ नावाचे एक अत्यंत प्रगत एआय मॉडेल विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान मेंदूच्या एमआरआय स्कॅनचे विश्लेषण अवघ्या काही सेकंदात करण्यास सक्षम आहे.
मेंदूच्या आजारांचे तत्काळ निदान या नवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने ब्रेन स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेजसारख्या गंभीर आजारांची वेगाने ओळख करण्यासाठी केला जाणार आहे. ‘प्राइमा’ केवळ आजाराचे निदानच करत नाही, तर कोणत्या रुग्णाला इमर्जन्सी वैद्यकीय मदतीची गरज आहे, हेदेखील ठरवते. 

एमआरआय कशासाठी?
एमआरआय (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग) ही एक प्रगत निदान चाचणी आहे. मेंदू, पाठीचा कणा, सांधे, स्नायू आणि मऊ उतींमधील ट्यूमर, संसर्ग किंवा दुखापती शोधण्यासाठी याचा मुख्यत्वे वापर होतो. योग्य निदानासाठी, उपचार नियोजनासाठी डॉक्टर याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. 

ग्रामीण भागासाठी ठरणार वरदान 
तज्ज्ञांच्या मते, रेडिओलॉजिस्टची कमतरता असलेल्या रुग्णालयांसाठी ‘प्राइमा’ एक वरदान ठरू शकते. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात रुग्णालयांमध्ये जिथे तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता कमी असते, तिथे हे तंत्रज्ञान वेळेवर उपचार मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. भविष्यात इतर वैद्यकीय चाचण्यांमध्येही याचा वापर वाढण्याची शक्यता आहे.

प्राइमाची वैशिष्ट्ये 

उच्च अचूकता : ५० हून अधिक रेडिओलॉजिकल निदानांमध्ये या एआय मॉडेलची यशस्विता ९७.५ %पर्यंत आहे. 

प्रचंड डेटावर आधारित : हे मॉडेल २,००,००० हून अधिक एमआरआय स्टडीज आणि ५६ लाख इमेजिंग सीक्वेन्सवर प्रशिक्षित करण्यात आले आहे. 

तत्काळ अलर्ट : रुग्णात गंभीर लक्षणे आढळली, तर प्राइमा त्वरित संबंधित न्यूरोसर्जनला अलर्ट पाठवते. यामुळे उपचारांमधील विलंब टाळता येतो.

Web Title : AI क्रांति: सेकंडों में MRI रिपोर्ट, जीवन की रक्षा

Web Summary : एआई 'प्राइमा' मस्तिष्क एमआरआई स्कैन का तेजी से विश्लेषण करता है, स्ट्रोक और रक्तस्राव जैसी स्थितियों का उच्च सटीकता के साथ निदान करता है। यह महत्वपूर्ण मामलों के बारे में न्यूरोसर्जन को सतर्क करता है, विशेषज्ञों की कमी वाले क्षेत्रों के लिए एक वरदान साबित होता है, संभावित रूप से अन्य चिकित्सा परीक्षणों तक विस्तारित होता है।

Web Title : AI Revolution: MRI Reports in Seconds, Saving Lives

Web Summary : AI 'Prima' analyzes brain MRI scans rapidly, diagnosing conditions like strokes and hemorrhages with high accuracy. It alerts neurosurgeons to critical cases, proving a boon for areas lacking specialists, potentially expanding to other medical tests.