ब्रिटनचा पुढील PM कोण? इन्फोसिसच्या नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 04:50 PM2022-07-07T16:50:29+5:302022-07-07T18:33:25+5:30

ब्रिटनमध्ये सेक्स स्कँडलवरून मोठे वादळ उठले आहे. यात ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागत आहे. अशावेळी ब्रिटनचा पुढील पंतप्रधान कोण याच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे.

Revenge of the times! Will the Indians rule over the British now? Who is the next PM of Britain after boris johnson? rushi Sunak in the discussion | ब्रिटनचा पुढील PM कोण? इन्फोसिसच्या नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनक चर्चेत

ब्रिटनचा पुढील PM कोण? इन्फोसिसच्या नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनक चर्चेत

Next

अमेरिकेसारख्या बलाढ्य महाशक्तीची भारतीय महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. आता एकेकाळी जगावर अधिराज्य गाजविणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधान पदावर भारतीयाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.  ब्रिटनमध्ये सेक्स स्कँडलवरून मोठे वादळ उठले आहे. यात ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागत आहे. अशावेळी ब्रिटनचा पुढील पंतप्रधान कोण याच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे. यात एक आहेत भारतीय वंशाचे ऋषी सुनक.

सत्ताधारी कंझर्वेटिव्ह पक्षाच्या चार कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये सुनक आणि साजिद वाजिदसह सायमन हार्ट आणि ब्रैंडन लुईस आहेत. सुनक हे अर्थमंत्री होते. त्यांना ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. सुनक हे इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. रशियामधील व्यवसाय, संपत्तीवरून सुनक काही महिन्यांपूर्वी वादात आले होते. सुवक हे ४२ वर्षांचे आहेत.

या वर्षीच्या सुरुवातीला ब्रिटनच्या एका कुख्यात सट्टेबाजाने बोरिस जॉन्सन लवकरच राजीनामा देतील अशी भविष्यवाणी केली होती. तसेच त्यांच्या जागी ऋषी सुनक पंतप्रधान बनतील असेही म्हटले होते. आता या सट्टेबाजाची अर्धी भविष्यवाणी खरी ठरली आहे. 

पंतप्रधान पदासाठी सुनक यांच्यासह पेनी मॉरडॉन्ट, बेन वॉलेस, साजिद वाजिद, लिज ट्रस आणि डोमिनिक राब यांची नावे चर्चेत आहेत. सुनक यांचे आई वडील १९६० मध्ये ब्रिटनला गेले होते. १९८० साउथम्पैटनमध्ये सुनक यांचा जन्म झाला. वडील डॉक्टर होते. ऋषी यांना आणखी दोन भावंडे आहेत. ब्रिटेन विंचेस्टर कॉलेजमध्ये पॉलिटीकल सायन्समधून पदवी घेतली होती. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीतून फिलॉसॉफी आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला. ते काही काळ गोल्डमैन सॅक्समध्ये काम करत होते. नंतर हेज फंड फर्म्समध्ये पार्टनर बनले.

स्टैनफोर्ड यूनिवर्सिटीमध्ये एमबीए करत असताना त्यांची ओळख अक्षता मूर्तिसोबत झाली. यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांना कृष्णा आणि अनुष्का अशी दोन मुले आहेत. 
 

Web Title: Revenge of the times! Will the Indians rule over the British now? Who is the next PM of Britain after boris johnson? rushi Sunak in the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.