संशोधकांचा 'चिरतरुण' फॉर्म्युला; चेहऱ्यावरील सुरकुत्यांची चिंता आता मिटली !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 06:26 AM2024-02-04T06:26:16+5:302024-02-04T06:27:19+5:30

वृद्ध पेशींना तरुण करण्यात अमेरिकेतील संशोधकांना यश

Researchers' Ageless Formula; The worry of wrinkles on the face is now over! | संशोधकांचा 'चिरतरुण' फॉर्म्युला; चेहऱ्यावरील सुरकुत्यांची चिंता आता मिटली !

संशोधकांचा 'चिरतरुण' फॉर्म्युला; चेहऱ्यावरील सुरकुत्यांची चिंता आता मिटली !

न्यूयॉर्क : एका विशिष्ट वयानंतर तारुण्य आटू लागते, शरीर थकते. वार्धक्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या घालवण्यासाठी सर्व जण निरनिराळे महागडे उपचार सुरू करतात; परंतु चेहऱ्यावरील सुरकुत्या काही जात नाहीत; पण चिंता करू नका. अमेरिकेतील वैज्ञानिकांनी असा काही शोध लावला आहे की, तुमच्या चेहऱ्यावर कधीही सुरकुत्या पडणार नाही, तुम्ही नेहमी जवान दिसाल आणि तरुणांप्रमाणेच सर्व कामे वेगाने करू शकाल. न्यूयॉर्कमधील कोल्ड स्रिंग हार्बर लॅबोरेटरीतील संशोधकांनी शरीरातील पांढऱ्या पेशींना पुन्हा सक्रिय करण्याचे तंत्र शोधून काढले आहे. 

तंत्र कसे काम करते? 
वय वाढत जाते त्यानुसार शरीरातील पेशींवर परिणाम होत जातो. शरीरात स्थूलपणा वाढत जातो. वय वाढलेल्या पेशी हळूहळू आपल्याप्रमाणे प्रतिपेशींची निर्मिती करू शकत नाहीत. पुढे ही निर्मितीची प्रक्रिया थांबते. त्वचेत नव्या पेशी निर्माण होत नाहीत. 
जुन्या पेशींमुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. संशोधकांनी कायमेरिक अँटीजन रिसेप्टर थेरपीद्वारे शरीरातील ‘टी सेल्स’मध्ये काही बदल घडवून आणले आहेत. ही थेरपी वृद्ध झालेल्या पेशींना दुरुस्त करून पूर्वीप्रमाणे सक्रिय बनविते, असे या संशोधनात दिसून आले आहे.

तरुण बनले अधिक चपळ 
संशोधकांनी ‘सीएआर’ थेरपीची चाचणी उंदरावर केली असता आश्चर्यकारक परिणाम दिसून आले. यामुळे वृद्ध झालेले उंदीर तरतरीत झालेले दिसले. त्यांचे वजनही कमी झाले. पचनक्रियेत सुधारणा झाली. त्यांचे व्यवहार तरुण उंदरांप्रमाणे  झाल्याचे दिसले. या प्रयोगानंतर तरुण उंदीर आणखी चपळ झाल्याचे दिसून आले. 

डायबेटिसवर रामबाण उपाय
nसंशोधकांच्या पथकात असलेल्या कोरिना अमोर वेगास यांनी सांगितले की, आतापर्यंत रक्तातील पांढऱ्या पेशी म्हणजे ‘टी सेल्स’ना पुन्हा प्रोग्राम करणे शक्य झालेले नव्हते; 
nपरंतु आमच्या संशोधनामुळे ‘टी सेल्स’ला नवे रूप देणे शक्य होणार आहे. ‘टी-सेल्स’चे आयुष्य वाढविण्यास मदत होणार आहे. स्थूलपणा, तसेच मधुमेहाच्या रुग्णांना ही थेरपी खूप लाभदायक ठरणार आहे.

Web Title: Researchers' Ageless Formula; The worry of wrinkles on the face is now over!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.