शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

गलवान संघर्षानंतर चीनशी संबंध बिघडले; जयशंकर म्हणाले चीन खोटारडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 10:03 IST

...तर संपूर्ण जगावर परिणाम : जयशंकर

न्यूयॉर्क : २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध “सामान्य” नाहीत आणि कदाचित हा मुद्दा अपेक्षेपेक्षा जास्त काळ पुढे ताणला जाऊ शकतो. सीमेवर आपले सैन्य जमविण्याबाबत चीनने दिलेले कोणतेही स्पष्टीकरण न पटण्यासारखे आहे, असे वक्तव्य परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे.

परराष्ट्रमंत्री सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले की, पूर्व लडाखच्या सीमेवर परिस्थिती सामान्य नाही, याबाबत भारत सतत आवाज उठवत आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सामान्य करण्यासाठी सीमेवर शांतता आणि सलोखा महत्त्वाचा आहे. परराष्ट्र संबंध परिषदेत भारत-चीन संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, जगातील दोन मोठ्या देशांमध्ये एवढ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला तर त्याचा परिणाम सर्व जगावर होईल.कठोर लॉकडाऊन असताना...

ते म्हणाले की, १९९३ आणि १९९६ मध्ये भारताने चीनसोबत सीमा स्थिरतेसाठी दोन करार केले. भारत किंवा चीन दोघेही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य जमा करणार नाहीत आणि जर दोन्ही बाजूंनी ठरावीक संख्येपेक्षा जास्त सैन्य आणले तर ते दुसऱ्या बाजूला कळवतील, असे यात स्पष्टपणे म्हटले होते. २०२० पर्यंत हीच परिस्थिती होती. मात्र, कोरोनात आम्ही मोठ्या संख्येने चिनी सैन्य सीमेवर जाताना पाहिले. त्यानंतर दोन्ही देशांत संघर्ष झाला आणि आमचे २० सैनिक शहीद झाले, असे ते म्हणाले.

परराष्ट्र मंत्री म्हणाले..n सध्या दोन्ही देशांत चर्चा सुरू असली तरी चीनकडून करारांचे उल्लंघन करून मोठ्या संख्येने सैनिक सीमेवर तैनातn चीनशी सध्या सामान्यपणे वागणे खूप कठीण. चिनी नौदलाची झपाट्याने वाढ होत आहे. ते कुठेतरी तैनात करण्याचा त्यांचा विचार असेल n चीनच्या आव्हानाला हे सरकार चोख प्रत्युत्तर देईल.

चीन खोटारडा २००९ ते २०१३ या काळात चीनमध्ये भारताचे राजदूत राहिलेले जयशंकर म्हणाले, की,  चीनसोबतच्या संबंधांची खासियत ही आहे की ते असे का करतात हे ते कधीच सांगत नाहीत. आपण ज्यावेळी याचा शोध घ्यायला जातो, त्यावेळी अनेक बाबी संदिग्ध राहतात. चीनने याबाबत अनेक स्पष्टीकरणे दिली आहेत, परंतु त्यापैकी एकही खरे नाही.

भूमिका बदललीपरराष्ट्र मंत्री म्हणाले की, ज्या देशाने करार मोडले आहेत, त्यांच्याशी सामान्य राहण्याचा प्रयत्न करणे खूप कठीण आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला तर ही काही सामान्य परिस्थिती नाही. दोन्ही देशांतील संपर्क बिघडला आहे. प्रवास थांबला आहे.  आमच्याकडे लष्करी तणाव नक्कीच जास्त आहे. याचा परिणाम भारताच्या चीनबाबतच्या भूमिकेवरही झाला आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर