Red Sky in China: मोठ्या संकटाचे संकेत? चीनमध्ये आकाशाचा रंगच बदलला, तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 21:31 IST2022-05-09T21:30:53+5:302022-05-09T21:31:26+5:30
Red Sky in China: चीनमधील झोउशान शहरात आकाशाचा रंग बदलून तो भट्टीतील लोखंडासारखा लालेलाल दिसू लागला आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जाऊ लागला आहे.

Red Sky in China: मोठ्या संकटाचे संकेत? चीनमध्ये आकाशाचा रंगच बदलला, तर्कवितर्कांना उधाण
बीजिंग - चीनमधील झोउशान शहरात आकाशाचा रंग बदलून तो भट्टीतील लोखंडासारखा लालेलाल दिसू लागला आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जाऊ लागला आहे. त्यामध्ये लोक घाबरून आरडा-ओरड करताना दिसत आहेत.
चीनमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Sina Weibo वर रेड स्काय टॉपिक टॉप ट्रेंडमध्ये आहे. या टॉपिकवर १५० मिलियनहून अधिक व्ह्यूज आले आहेत. टिकटॉकचे चिनी व्हर्जन असलेल्या Douyin वर युझर्स या लाल आकाशाला अपशकून म्हणत आहेत. त्याला ते चीनमधील कोविड-१९ च्या साथीशी संबंध जोडून पाहत आहेत.
एका युझरने सांगितलं की, कुठलं तरी मोठं संकट येणार आहे. दुसऱ्याने यामध्ये अधिक भर घालताना सांगितले की, मी वस्तूंचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवरही लोक चीनमधील हा व्हिडीओ शेअर करून यामधील कारण विचारताना दिसत आहेत.
मात्र स्थानिक मीडियाने आकाशातील लाल रंगाबाबत पसरत असलेल्या अफवांना चुकीचं असल्याचे सांगितले आहे. तसेच हे दृश्य लाईट रिफ्रेक्शनमुळे दिसल्याचे म्हटले आहे. ग्लोबल टाइम्सला झोउशान मेट्रोलॉजिकल ब्युरोने सांगितलं की, जेव्हा हवामान सुरळीत होतं, तेव्हा वातावरणामधील अधिकच्या पाण्यामधून एअरोसोल्स तयार होतात. ते फिशिंग बोट्सच्या लाईटला स्केटर आणि रिफ्लेक्ट करतात. त्यामुळेच लोकांना लाल आकाश दिसतं.