आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 21:00 IST2024-05-26T20:59:34+5:302024-05-26T21:00:09+5:30
Qatar Airways Turbulence: या घटने 6 क्रू-मेंबर्ससह 6 प्रवासी जखमी झाले आहेत.

आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
Qatar Airways Turbulence: कतारची राजधानी दोहा येथून आयर्लंडला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमान टर्ब्युलन्समध्ये अडकले. यामुळे विमानातील किमान 12 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सहा क्रू मेंबर्सचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कतार एअरवेजचे विमान QR017(बोईंग 787 ड्रीमलाइनर) तुर्कस्तानवरुन जात असताना अचानक टर्ब्युलन्समध्ये अडकले. पण अखेर पायलटने दुपारी 1 च्या सुमारास विमानतळावर विमानाची सुखरुप लँडिंग केल. लँडिंग होताच पोलिस आणि अग्निशमन दलासह बचाव पथकाने विमानाकडे धाव घेतली. या घटनेत सहा प्रवासी आणि सहा कर्मचारी (एकूण 12) जखमी झाले आहेत.
यापूर्वी घडली अशीच घटना
अलीकडेच लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या सिंगापूर एअरलाइन्सचे विमानदेखील टर्ब्युलन्समध्ये अडकले होते. अवघ्या पाच मिनिटांत विमान 6000 फूट खाली आले. या घटनेत एका 73 वर्षीय ब्रिटीश व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले होते. टर्ब्युलन्सनंतर विमानाची बँकॉकमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आली आणि तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.