Putin India Visit: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज(दि.4) सायंकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय वंशाचे रशियन आमदार अभय कुमार सिंह चर्चेत आले आहेत. अलीकडेच त्यांनी भारत-रशिया संबंधांना आणखी बळकटी देण्याचे आवाहन केले असून, भारताने रशियाकडून मिळालेल्या S-500 एअर डिफेन्स सिस्टमच्या ऑफरचा गंभीरपणे विचार करावा, अशी विनंती केली आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतिन आज 23 व्या वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेकरिता दिल्लीत दाखल होत आहेत. त्यांच्या भेटीदरम्यान संरक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञानाशी संबंधित महत्त्वपूर्ण करारांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पुतिन यांच्यासोबत मोठी टीम भारतात येणार...
या दौऱ्याबाबत अभय कुमार सिंह म्हणाले की, राष्ट्राध्यक्षांसोबत रशियाची मोठी प्रतिनिधीमंडळ येत आहे. रशियाचे आरोग्यमंत्रीही या भेटीत सहभागी होणार आहेत. आरोग्य क्षेत्रावर चर्चा होईलच, पण त्यासोबतच हत्यारे, दारुगोळा आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित शस्त्र प्रणालींवरही चर्चा होईल. तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे आणि भारताने या प्रगत प्रणालींसाठी करार करण्याची हीच योग्य वेळ आहे.
कोण आहेत अभय कुमार सिंह ?
अभय कुमार सिंह हे व्लादिमिर पुतिन यांच्या युनायटेड रशिया पार्टी (URP) चे सदस्य आहेत. पश्चिम रशियातील कुर्स्क प्रदेशातून ते दोनदा ‘डेप्युटेट’ (आमदार) म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा जन्म बिहारच्या पटना येथे झाला. 1991 मध्ये ते मेडिसिनच्या शिक्षणासाठी रशियात गेले आणि स्थायिक झाले. शिक्षणादरम्यान त्यांना पुतिन भेटले आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी पुढे राजकारणात प्रवेश केला. आज ते कुर्स्कमध्ये स्थायिक असून रशियन राजकारणातील प्रभावी भारतीय वंशाचे नेते मानले जातात.
Web Summary : Ahead of Putin's India visit, Russian MLA Abhay Kumar Singh, originally from Bihar, advocates for stronger India-Russia ties and urges India to consider Russia's S-500 air defense system offer. He highlights potential deals in defense, health, and technology.
Web Summary : पुतिन की भारत यात्रा से पहले, बिहार मूल के रूसी विधायक अभय कुमार सिंह ने भारत-रूस संबंधों को मजबूत करने की वकालत की और भारत से रूस के एस-500 वायु रक्षा प्रणाली प्रस्ताव पर विचार करने का आग्रह किया। उन्होंने रक्षा, स्वास्थ्य और प्रौद्योगिकी में संभावित सौदों पर प्रकाश डाला।