शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

पूूज्य जोगिणीला पोपनी केले संतपद बहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 4:49 AM

मृत्यूनंतर ९५ वर्षांनी केरळमधील मरियम थ्रेसिया यांचा गौरव; रुग्णांची शुश्रुषा, एकाकी लोकांना दिलासा

व्हॅटिकन सिटी : केरळमधील शेकडो वर्षांच्या जुन्या सिरो-मलबार चर्चच्या मरियम थ्रेसिया या जोगिणीसह एकूण पाच जणांना पोप फ्रान्सिस यांनी रविवारी कॅथलिक ख्रिश्चनांचे पूज्य संत म्हणून घोषित केले. त्रिचूर येथे मे १९१४ मध्ये ‘सिस्टर्स आॅफ दी होली फॅमिली’ची स्थापना करणाऱ्या मरियम थ्रेसिया यांना मृत्यूनंतर तब्बल ९५ वर्षांनी संतपदाचे भाग्य लाभले.

येथील सेंट पीटर्स स्वेअरमध्ये झालेल्या विशेष भव्य समारंभात पोप फ्रान्सिस यांनी मरियम थ्रेसिया यांच्याखेरीज ज्यांना संतपद बहाल केले केले त्यांत इंग्लंडचे कार्डिनल जॉन हेनरी न्यूमन, स्वित्झर्लंडमधील एक सर्वमान्य ख्रिश्चन भाविक मार्गारेट बेज, ब्राझिलच्या सिस्टर ड्युलसे लोपेज व इटालिच्या सिस्टरग्युसेपिना वान्निनी यांचा समावेश आहे.लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात पाचही नव्या संतांची भलीमोठी पोट्रेट सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या इमारतीवर दिमाखात लावण्यात आली होती.

संतपद मिळण्यासाठी संबंधित व्यक्तिच्या दैवी शक्तिने झालेले, ज्याचे वैज्ञानिक तर्काने स्पष्टिकरण होऊ शकत नाही, असे दोन चमत्कार पोपकडून मंजूर होणे आवश्यक असते. मरियम थ्रेसिया यांच्या नावे असलेला एक चमत्कार सन २००९ मधील होता. जगण्याची आशा सोडलेल्या एका अपुºया दिवसांनी जन्माला आलेल्या अर्भकाच्या छातीवर मरियम यांचे पवित्र अंश ठेवल्यानंतर त्याचे प्राण वाचले होते.

रविवारी मरियम थ्रेसिया यांच्या संतपदाच्या समारंभास जीवनदान मिळालेले ते मूल, त्याचे डॉक्टर यांच्यासह केरळमधील चर्चच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह शेकडो भाविक आवर्जून उपस्थित होते. याखेरीज परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या नेतृत्वाखाली केरळमधील अनेक संसद सदस्यांचा समावेश असलेले भारताचे एक राजकीय शिष्टमंडळही हजर होते.मरियम थ्रेसिया यांच्या या गौरवाने केरळच्या सिरो-मलबार चर्चचे आता चार संत झाले आहे. याआधी संतपद मिळालेल्यांमध्ये सिस्टर अल्फोन्सो, फादर कुरियाकोस इलियस चावारा आणि सिस्टर युफ्रेशिया यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)पापक्षालनासाठी सोसले कष्टमरियम थ्रेसिया यांनी येशू ख्रिस्ताचे अनुकरण करीत गरिबांची सेवा केली, रुग्णांची सुश्रुषा केली आणि निराधार, एकाकी राहणाºया लोकांना दिलासा दिला. सैतानी प्रवृत्तींनी आयुष्यभर त्यांना त्रास दिला; पण इतरांच्या पापक्षालनासाठी त्यांनी हे क्लेष निमूटपणे सोसले.(व्हॅटिकन न्यूजमधील सन्मान)