शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

चीनला तगडा झटका! PUBG, TikTok बॅनमुळे तब्बल 1.46 लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 3:31 PM

PUBG, TikTok Ban in India: PUBG देशांच्या हिशोबाने कधीही कमाईचा आकडा जाहीर करत नाही. मात्र, अंदाजे हा आकडा भारतीय बाजारातून 80 ते 10 दशलक्ष डॉलर एवढा आहे. म्हणजेच 223 कंपन्यांच्या कमाईचा निम्मा.

ठळक मुद्दे इंडस्ट्रीतील सुत्रांनुसार पब्जीच्या उत्पन्नात भारतीयांचा वाटा 5 टक्के आहे. म्हणजेच भारत हा पब्जीला जास्त महसूल देणारा देश नाहीय.भारतात अ‍ॅप्स डाऊनलोड आणि अ‍ॅक्टिव वापरामुळे कंपन्यांना तगडी कमाई होत होती. अमेरिका, जपान, चीन आणि साऊथ कोरियाच्या तुलनेत भारतातून मिळणारा गेमिंग रेव्हेन्यू खूपच कमी आहे.भारतात 300 दशलक्ष ऑनलाईन गेम खेळणारे युजर आहेत. त्यापैकी 85 टक्के युजर हे मोबाईलवर गेम खेळतात. 

नवी दिल्ली : लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीनवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. भारतात कमालिची लोकप्रिय असलेल्या PUBG, TikTokसह 224 चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणली आहे. याचा चीनला जोरदार झटका बसणार आहे. डाटा सिक्युरिटी आणि 130 कोटी भारतीयांचा खासगीपणा यामुळे धोक्यात असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे. या बंदीचा चीनला तब्बल 200 दशलक्ष डॉलर म्हणजेच 1,46,600 कोटी रुपयांचा वार्षिक फटका चीनला बसणार आहे. एकटे पब्जी बंद झाल्याने 100 दशलक्ष डॉलरचा झटका बसणार आहे. (PUBG, TikTok Ban in India)

काऊंटरपॉईंट रिसर्चचे वरिष्ठ अ‍ॅनालिस्ट पावेल नाईया सांगतात की. भारत सरकारने एकाच फटक्यात चिनी अ‍ॅप बंद न करता तीन टप्प्यांत बॅन केले आहेत. या अ‍ॅपद्वारे चिनी कंपन्य़ा भारतीयांकडून 200 दशलक्ष डॉलर एवढी मोठी कमाई करत होत्या. 

PUBG देशांच्या हिशोबाने कधीही कमाईचा आकडा जाहीर करत नाही. मात्र, अंदाजे हा आकडा भारतीय बाजारातून 80 ते 10 दशलक्ष डॉलर एवढा आहे. म्हणजेच 223 कंपन्यांच्या कमाईचा निम्मा. ही कमाई अ‍ॅक्टिव्ह युजर्सवर अवलंबून असते. इंडस्ट्रीतील सुत्रांनुसार पब्जीच्या उत्पन्नात भारतीयांचा वाटा 5 टक्के आहे. म्हणजेच भारत हा पब्जीला जास्त महसूल देणारा देश नाहीय. मात्र, भारतात पब्जीचे मोठ्या प्रमाणावर युजर होते. जे कंपनीला भविष्यासाठी संपत्ती होऊ शकत होते. म्हणजेच जर कंपनीला पब्जी विकायचे असेल तर त्याची किंमत लाखो करोडोमध्ये येणार होती. पब्जीचा मुख्य स्रोत हा अ‍ॅप पर्चेस होता. 

मात्र भारतात अ‍ॅप्स डाऊनलोड आणि अ‍ॅक्टिव वापरामुळे कंपन्यांना तगडी कमाई होत होती. अमेरिका, जपान, चीन आणि साऊथ कोरियाच्या तुलनेत भारतातून मिळणारा गेमिंग रेव्हेन्यू खूपच कमी आहे. भारत हा महसूल प्राप्तीच्या बाबतीत पहिल्या 10 देशांच्या यादीतही येत नाही. तर कॅनडा. इटली, स्पेनमध्ये 30-50 दशलक्ष युजरकडून जवळपास 2.6 अब्ज डॉलरची कमाई होते. Newzoo च्या 2020 मधील रिपोर्टनुसार 2019 मध्ये गेम मार्केटमध्ये 147.5 अब्ज डॉलरची कमाई करण्यात आली आहे. यामध्ये 73 टक्के कमाई ही गेम खरेदी केल्याने झाली आहे. भारतात 300 दशलक्ष ऑनलाईन गेम खेळणारे युजर आहेत. त्यापैकी 85 टक्के युजर हे मोबाईलवर गेम खेळतात. 

EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको'

रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार

IMP: कार चालविताना मास्क बंधनकारक? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा खुलासा

चीनच नाही, पाकिस्तानकडूनही हल्ल्याची शक्यता; बिपीन रावत यांचा गंभीर इशारा

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमTik Tok Appटिक-टॉकindia china faceoffभारत-चीन तणाव