पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 05:59 IST2025-10-05T05:18:18+5:302025-10-05T05:59:42+5:30
जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीने ३८ मुद्द्यांचा एक मसुदा सरकारपुढे ठेवला.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमधील फेडरल सरकार नागरिकांच्या हक्कांवर गदा आणत असल्याने तेथे गेले महिनाभर सुरू असलेले आंदोलन निवळले आहे. शनिवारी फेडरल सरकार व जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीच्या नेत्यांमध्ये करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीने ३८ मुद्द्यांचा एक मसुदा सरकारपुढे ठेवला. या मसुद्यातल्या २५ मुद्द्यांवर सरकार सहमत झाल्याची माहिती पाकिस्तानचे संसदीय कामकाजमंत्री तारीख फझल चौधरी यांनी दिली आहे. हा करार शांततेचा विजय असल्याचीही प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली आहे.
सरकारने मान्य केलेल्या काही मागण्या
पुंछ व मुझफ्फराबाद येथे मध्यवर्ती व माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन करणार
१५ दिवसांत स्थानिक प्रशासनामार्फत रुग्णांना आरोग्य कार्ड देणार. या शिवाय पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व जिल्ह्यांमध्ये एमआरआय व सीटी स्कॅन मशीन बसवणार
संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमध्ये वीज योजना उभी करण्यासाठी १० अब्ज पाकिस्तानी रुपयांची गुंतवणूक
फेडरल सरकारच्या मंत्रिमंडळात २० पेक्षा अधिक मंत्री नसण्याची अट
मीरपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे करणार