अमेरिकेतून सन्मानाने परत जा, २ लाख रुपये अन् मोफत विमान तिकीट मिळवा! ट्रम्प सरकारची नवी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:22 IST2026-03-18T13:18:12+5:302026-03-18T13:22:48+5:30

विमानाचं फ्री तिकीट अन् खि़शात २ लाख; ताजमहल दाखवून ट्रम्प सरकारचं भारतीयांना 'घरवापसी'चं आवाहन

Project Homecoming US DHS Uses Taj Mahal Imagery to Invite Undocumented Indians Home | अमेरिकेतून सन्मानाने परत जा, २ लाख रुपये अन् मोफत विमान तिकीट मिळवा! ट्रम्प सरकारची नवी ऑफर

अमेरिकेतून सन्मानाने परत जा, २ लाख रुपये अन् मोफत विमान तिकीट मिळवा! ट्रम्प सरकारची नवी ऑफर

US Project Homecoming: अमेरिकेतील अनधिकृत स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने आता एक नवी खेळी खेळली आहे. प्रोजेक्ट होमकमिंग' अंतर्गत, जे स्थलांतरित स्वतःहून देश सोडून जाण्यास तयार आहेत, त्यांना अमेरिकन सरकारकडून मोफत विमान तिकीट आणि २,६०० डॉलर्स (सुमारे २.१५ लाख रुपये) प्रोत्साहन भत्ता दिला जात आहे. होमलँड सिक्युरिटीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

ताजमहलच्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा

अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने या योजनेच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर काही पोस्टर्स शेअर केली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, भारतीयांना आकर्षित करण्यासाठी या पोस्टरवर आग्रा येथील ताजमहलचा फोटो वापरण्यात आला आहे. यासोबतच चीन आणि कोलंबियाच्या प्रसिद्ध स्थळांची चित्रेही वापरून त्या देशांतील नागरिकांना परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

'CBP Home' ॲपद्वारे नोंदणी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थलांतरितांना सीबीपी होम नावाच्या मोबाइल ॲपवर स्वतःची नोंदणी करावी लागेल. या प्रक्रियेत अर्जदाराला आपली वैयक्तिक माहिती भरावी लागेल. स्वेच्छेने देश सोडण्याचा आपला इरादा स्पष्ट करावा लागेल. एकदा का अर्ज मंजूर झाला की, सरकार प्रवासाची सोय आणि आर्थिक मदत करेल. "एका नवीन सुरुवातीसाठी मायदेशी परत जा! विनामूल्य विमान प्रवास आणि २,६०० डॉलर्सचा बोनस मिळवा," असे आवाहन पोस्टमध्ये करण्यात आले आहे.

भारतीय समुदायावर काय परिणाम?

२०२२ च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत सुमारे ७.२५ लाख भारतीय अनधिकृतपणे राहत आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे या समुदायात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे सन्मानाने परत जाण्याची संधी असे सरकार म्हणत असले, तरी दुसरीकडे अमेरिकेत वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे भारतीय व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

काय आहे प्रोजेक्ट होमकमिंग?

हे अभियान ट्रम्प प्रशासनाने २०२५ मध्ये सुरू केले आहे. ज्यांच्याकडे अमेरिकेत राहण्यासाठी कायदेशीर कागदपत्रे नाहीत, त्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक पद्धतीने मायदेशी पाठवणे हा यामागचा उद्देश आहे. माजी गृहसचिव क्रिस्टी नोम यांच्या दाव्यानुसार, ट्रम्प प्रशासनाच्या कडक धोरणांमुळे आतापर्यंत लाखो लोकांनी स्वेच्छेने देश सोडला आहे. १ जानेवारी २०२५ ते २८ नोव्हेंबर २०२५ या काळात ३,२५८ भारतीय नागरिकांना अमेरिकेतून परत पाठवण्यात आले आहे.

Web Title : अमेरिका का 'प्रोजेक्ट होमकमिंग': वापस जाने पर मुफ़्त टिकट, पैसे!

Web Summary : अमेरिका 'प्रोजेक्ट होमकमिंग' के तहत अवैध प्रवासियों को घर लौटने के लिए पैसे और मुफ्त टिकट दे रहा है। ताजमहल की तस्वीरों के साथ भारतीयों को आकर्षित किया जा रहा है, $2,600 और मुफ्त हवाई किराया मिल रहा है। लगभग 7.25 लाख भारतीय अवैध रूप से रह रहे हैं।

Web Title : US offers returnees money, free ticket under 'Project Homecoming'.

Web Summary : US offers undocumented immigrants money and free tickets to return home under 'Project Homecoming'. The program targets Indians, using Taj Mahal imagery to encourage participation, offering $2,600 and free airfare. 7.25 lakh Indians are reportedly living in the US illegally.