राजकन्येने नाकारला आठ कोटींचा नजराणा; राजकन्या सामान्य व्यक्तीशी करणार विवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 08:52 IST2021-09-04T08:24:05+5:302021-09-04T08:52:26+5:30
जपानचे युवराज अखिशिनो यांची मुलगी असलेल्या माको व केई कोमुरो यांचे प्रेमसंबंध व होऊ घातलेल्या विवाहावरून जपानी जनतेने संमिश्र मते व्यक्त केली होती.

राजकन्येने नाकारला आठ कोटींचा नजराणा; राजकन्या सामान्य व्यक्तीशी करणार विवाह
टोकियो : जपानची राजकन्या माको ही राजघराण्यातील नसलेल्या केई कोमुरो या प्रियकराबरोबर लवकरच विवाह करणार असून, त्यानंतर ती अमेरिकेत राहाणार आहे. राजघराणेबाह्य व्यक्तीबरोबर विवाह करणाऱ्या राजकन्या माको हिला देण्यात येणारा आठ कोटी रुपयांचा नजराणाही तिने नाकारला आहे.
जपानचे युवराज अखिशिनो यांची मुलगी असलेल्या माको व केई कोमुरो यांचे प्रेमसंबंध व होऊ घातलेल्या विवाहावरून जपानी जनतेने संमिश्र मते व्यक्त केली होती. राजघराणेबाह्य व्यक्तीशी विवाह केल्यानंतर माकोला तिचे राजघराण्याशी निगडित सर्व अधिकारांवर पाणी सोडावे लागेल.
हॅरी व मेगन मर्केलबरोबर तुलना नको
ब्रिटनचा राजपुत्र हॅरी याने राजघराण्यातील नसलेल्या मेगन मर्केल या युवतीबरोबर विवाह केला होता. त्यांच्याशी आमची तुलना कुणीही करू नये, असे जपानची राजकन्या माको हिने म्हटले आहे. जपानमधील अनेक लोकांना माको हिने राजघराण्याबाहेरील व्यक्तीशी विवाह करणे पसंत पडलेले नाही, असे वृत्तपत्रे व समाजमाध्यमांवरील प्रतिक्रियांवरून दिसून येते.