शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही वाट बघतोय, पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावर येतील", इराण युद्ध सुरू असतानाच रशियाचे परराष्ट्र मंत्री काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 18:38 IST

PM Modi Russia Visit: इराण-इस्रायल युद्ध पेटलेले असतानाच रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी रशियाच्या दौऱ्यावर येऊ शकतात', असे विधान रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी केले आहे. इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध शिगेला असतानाच लावरोव यांनी मोदींच्या रशिया दौऱ्याची आशा व्यक्त केली. भारताने पुन्हा रशियाकडून तेल खरेदी सुरू केल्यानंतर पहिल्यांदाच रशियाकडून भाष्य करण्यात आले आहे. 

सर्गेई लावरोव यांनी सोमवारी एका व्हिडीओ संदेशात म्हटले की, "आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावर्षीही रशियात येतील, याची वाट बघत आहोत. रशियाला आशा आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चालू वर्षातही रशियात येतील."

'रशिया आणि भारत: द्विपक्षीय संबंध नव्या उद्दिष्टांच्या दिशेने' या आंतरराष्ट्रीय संमेलनाला शुभेच्छा देणारा संदेश सर्गेई लावरोव यांनी पाठवला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले की, दोन्ही देशांचा संबंध वृद्धिंगत करण्यावर आणि व्यापार वाढवण्यावर भर आहे.

"भारत आणि रशिया सध्याच्या वार्षिक व्यापार (६८.७ अरब अमेरिकन डॉलर) हा २०३० पर्यंत १०० अरब अमेरिकन डॉलरपर्यंत नेण्यासाठी कटिबद्ध आहेत", असे एस. जयशंकर म्हणाले. 

भारतासमोर अनेक अप्रत्यक्ष आव्हाने -मोदी

एकीकडे 'रशिया आणि भारत' संमेलन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाबद्दल लोकसभेत निवेदन केले. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "पश्चिम आशियामधील परिस्थिती चिंताजनक आहे. तीन आठवड्यांपासून अधिक काळ या संकटाला झाला आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि लोकांच्या जगण्यावर परिणाम झाला आहे."

"भारतासमोरही या युद्धाने अप्रत्यक्ष आव्हाने उभी केली आहेत. ही आव्हाने अर्थव्यवस्थेशी संबंधित, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहेत. त्याचबरोबर माणुसकीच्या अनुषंगानेही आव्हाने उभी ठाकली आहेत", असे पंतप्रधान मोदी यांनी संसदेत सांगितले. 

"युद्धाच्या झळा बसत असलेल्या देशात भारतीय आहेत. तेथील भारतीयांशी उच्चायुक्तालय २४ संपर्कात आहे. त्यांची मदत केली जात आहे. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३ लाख ७५ हजार भारतीय सुरक्षितपणे मायदेशात परतले आहेत", अशी माहिती मोदींनी सभागृहात दिली. 

रशियाकडून तेल खरेदी सुरू

अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यास मनाई केली होती. मात्र, इराण युद्धामुळे आखाती देशातून होणारा तेल पुरवठा विस्कळीत झाला. युद्धजन्य परिस्थितीमुळे अमेरिकेने भारताला ३० दिवस रशियाकडून तेल खरेदी करण्यास मोकळीक दिली आहे. 

त्यामुळे आता भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करत आहे. तर आखाती देशातून एलपीजीची आयात करणे कठीण बनल्याने अमेरिकेकडून एलपीजी खरेदी केली जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Russia Awaits Modi's Visit Amidst Iran Conflict: Lavrov's Statement

Web Summary : Russia anticipates Prime Minister Modi's visit this year, stated Foreign Minister Lavrov amidst Iran-Israel tensions. India and Russia aim for $100 billion trade by 2030. Modi addressed India's challenges due to the Middle East conflict, ensuring citizen safety. India resumes Russian oil purchases.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीrussiaरशियाUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरCrude Oilखनिज तेल