शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान बालेन शाह यांचा 'मास्टरस्ट्रोक'; नेपाळमध्ये शिक्षण क्षेत्रातील राजकीय आखाडे हद्दपार; '१०० दिवसांचा ॲक्शन प्लॅन' जाहीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 15:27 IST

आता राजकारणाऐवजी विद्यार्थ्यांच्या वास्तविक समस्या मांडण्यासाठी पुढील ९० दिवसांत 'स्टुडंट कौन्सिल' किंवा 'वॉइस ऑफ स्टुडंट' सारखी बिगर राजकीय यंत्रणा उभारली जाणार आहे. याशिवाय, पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी आता नेपाळी नागरिकत्वाची अटही रद्द करण्यात आली आहे, यामुळे कागदपत्रांअभावी कुणाचेही शिक्षण थांबणार नाही.

नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह यांनी देशाची शिक्षण व्यवस्था राजकारण मुक्त करण्यासाठी शनिवारी रात्री उशिरा एक क्रांतिकारी '१०० दिवसांचा ॲक्शन प्लॅन' जाहीर केला आहे. शिक्षण संस्थांना केवळ ज्ञानाचे केंद्र बनवणे आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शैक्षणिक दर्जा सुधारणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेतील सर्वात मोठा निर्णय म्हणजे सर्व शाळा आणि विद्यापीठांमधील राजकीय पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनांना घालण्यात आलेली संपूर्ण बंदी. पुढील ६० दिवसांत या संघटनांना शैक्षणिक संकुलातील आपली कार्यालये हटवावी लागणार आहेत. आता राजकारणाऐवजी विद्यार्थ्यांच्या वास्तविक समस्या मांडण्यासाठी पुढील ९० दिवसांत 'स्टुडंट कौन्सिल' किंवा 'वॉइस ऑफ स्टुडंट' सारखी बिगर राजकीय यंत्रणा उभारली जाणार आहे. याशिवाय, पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी आता नेपाळी नागरिकत्वाची अटही रद्द करण्यात आली आहे, यामुळे कागदपत्रांअभावी कुणाचेही शिक्षण थांबणार नाही.

परदेशी नावांनी चालणाऱ्या शिक्षण संस्थांना नावे बदलावी लागणार - महत्वाचे म्हणजे, देशात 'ऑक्सफर्ड', 'पेंटागन' आणि सेंट झेवियर्स यांसारख्या परदेशी नावांनी चालणाऱ्या शिक्षण संस्थांना आता आपली नावे बदलून नेपाळी नावे ठेवावी लागणार आहेत. स्थानिक ओळख जपण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

परीक्षा मुक्त बालपण -लहान मुलांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता ५ वी पर्यंतच्या पारंपारिक परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, आता 'पर्यायी मूल्यमापन पद्धती' वापरली जाईल. याच बरोबर, विद्यापीठांमधील निकालांचा विलंब टाळण्यासाठी मंत्रालयाने निश्चित केलेल्या कॅलेंडरनुसार वेळेत निकाल लावणे बंधनकारक असेल.

यापूर्वी राजकीय हस्तक्षेपामुळे शैक्षणिक कॅलेंडर विस्कळीत होत  होते. परिणामी विद्यार्थ्यांना देशाबाहेर जाऊन शिक्षण पूर्ण करावे लागत होते. यानिर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Nepal's PM Shah Ends Political Meddling in Education; 100-Day Plan

Web Summary : Nepal's PM Shah's plan bans political student groups from schools and universities. 'Student Councils' will address issues. Nepali citizenship is no longer required for education up to graduation. Foreign-named schools must adopt Nepali names. Exams are scrapped up to 5th grade.
टॅग्स :NepalनेपाळEducationशिक्षणPoliticsराजकारण