शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 14:16 IST2025-07-14T14:12:24+5:302025-07-14T14:16:17+5:30

मात्र, भारतीय लष्कराने आणि हवाई दलाने उल्फा (आय) चे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावत, अशा कोणत्याही सीमापार हल्ल्याचा इन्कार केला आहे.

Powerful attack in neighboring country myanmar with airstrike, drones and missiles; India responded | शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!

शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!

भारताने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने आपल्या छावण्यांवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात टॉप कमांडर नयन मेधीसह अनेक टॉपचे अतिरेकी मारले गेल्याचा आरोप म्यानमारच्या सागाईंग प्रांतात सक्रिय असलेल्या उल्फा (आय) या अतिरेकी संघटनेने केला आहे. मात्र, भारतीय लष्कराने आणि हवाई दलाने उल्फा (आय) चे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावत, अशा कोणत्याही सीमापार हल्ल्याचा इन्कार केला आहे.

आसाममधील अतिरेकी संघटना, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) म्हणजेच उल्फाने (इंडिपेंडंट) एक निवेदन जारी करत, भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्या केल्याचा आरोप केला आहे. या निवेदनानुसार, रविवारी (१३ जुलै) सकाळी उल्फाचा टॉप कमांडर नयन मेधी उर्फ नयन असोमचा अंत्यसंस्कार सुरू असताना, तिथे उपस्थित असलेल्या आणखी एका कमांडरचाही क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाला.

म्यानमारच्या सागाईंग प्रांतात उल्फाचा -
उल्फाने केलेल्या आरोपानुसार, नयन मेधी याचाही छावणीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यातच मृत्यू झाला होता. ही छावणी भारताच्या सीमेला लागून असलेल्या म्यानमारमधील सागाईंग प्रांतातील वकथाम बस्ती येथे आहे. येथील अतिरेकी संघटना उल्फाची छावणी क्रमांक ७७९ आहे. याशिवाय, होयत बस्ती येथील उल्फाच्या पूर्वेकडील मुख्यालयावरही (कॅम्प) हल्ला करण्यात आला आहे. गेल्या दीड दशकात आसाममधील बंडखोरांचे उच्चाटन झाल्यानंतर, उल्फाने म्यानमारला आपला बालेकिल्ला बनवले आहे. 

उल्पाचे आरोप लष्करानं फेटाळले -
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय लष्कराने आणि हवाईदलाच्या सूत्रांनी म्यांमारमधील कुठल्याही प्रकारच्या क्रॉस बॉर्डर स्ट्राइकचा इंकार केला आहे. मानमारनेही अशा प्रकारच्या कुठल्याही स्ट्राइकच्या बाबतीत कुठलेही निवेदन जारी केलेलेनाही. 

Web Title: Powerful attack in neighboring country myanmar with airstrike, drones and missiles; India responded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.