कोरोनाच्या निर्बंधांना विरोध करणाऱ्या आंदोलकांचा संसदेत घुसण्याचा प्रयत्न, जर्मनीत पोलिसांवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 05:39 AM2020-08-31T05:39:12+5:302020-08-31T05:39:30+5:30

पोलिसांनी या घटनेची टिष्ट्वटरवरून माहिती देताना सांगितले की, अनेक लोक संसदेसमोर लावलेले अवरोधक तोडून राईशटॅगच्या (जर्मन संसदेच्या) पायऱ्यांवर चढले; परंतु त्यांना आत घुसण्यापासून रोखण्यात आले.

Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck | कोरोनाच्या निर्बंधांना विरोध करणाऱ्या आंदोलकांचा संसदेत घुसण्याचा प्रयत्न, जर्मनीत पोलिसांवर दगडफेक

कोरोनाच्या निर्बंधांना विरोध करणाऱ्या आंदोलकांचा संसदेत घुसण्याचा प्रयत्न, जर्मनीत पोलिसांवर दगडफेक

Next

बर्लिन : कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांनी जर्मनी ढवळून निघाली असून, शनिवारी आंदोलकांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले व बळाचा वापर करून तेथून हुसकावून लावले.
मास्क घालणे, डिस्टन्सिंग पाळणे, अशा उपाययोजनांना विरोध करण्यासाठी शनिवारी दिवसभर हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. बर्लिनच्या आसपास मिरवणुका काढणाºया निदर्शकांना पोलिसांनी रस्त्यातच रोखण्याचा प्रयत्न केला होता; परंतु काही आंदोलक राजधानीच्या भव्य ब्रँडनबर्ग गेटजवळ रॅली काढण्याचा प्रयत्न करीत होते.

पोलिसांनी या घटनेची टिष्ट्वटरवरून माहिती देताना सांगितले की, अनेक लोक संसदेसमोर लावलेले अवरोधक तोडून राईशटॅगच्या (जर्मन संसदेच्या) पायऱ्यांवर चढले; परंतु त्यांना आत घुसण्यापासून रोखण्यात आले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, तसेच बाटल्याही फेकल्या. त्यानंतर त्यांना बळाचा वापर करून तेथून हटवण्यात आले. अनेक जण ध्वज घेऊन तेथे पळत असल्याचे यासंबंधीच्या एका फुटेजमध्ये दिसते.

गृहमंत्री होर्स्ट सिहोफर यांनी या घटनेचा निषेध केला असून, आंदोलकांनी संसदेचा मान ठेवायला हवा. हा देश उदारमतवादी लोकशाहीचे प्रतीक आहे. दंगेखोरांनी या ठिकाणी केलेले कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी बजावले. काही दिवसांपूर्वीच हजारो आंदोलकांनी रशियन दूतावासाबाहेर जमून तेथेही दगडफेक केली होती, तसेच बाटल्या फेकल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी ३०० जणांना गजाआड केले होते.
बर्लिनच्या प्रांतीय सरकारने या निषेधांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या विरोधात आंदोलक रस्त्यावर उतरू शकतात आणि मास्क वापरण्यासह अनेक नियम पायदळी तुडवू शकतात, हे ध्यानात घेऊन बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. कोर्टानेही या आंदोलकांना डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, पोलिसांनी आंदोलकांना नियम पाळण्याचे आवाहन केले होते व मार्च न काढण्याचे आवाहन केले होते. तरीही यावेळी सुमारे ३८,००० हून अधिक लोक जमले होते. त्यांनी अनेक विषयांवर आपला रोष व्यक्त केला. लसीकरण, फेस मास्क व जर्मन सरकारविरोधात सर्वसाधारणपणे त्यांनी विरोध प्रकट केला. यावेळी अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचा निषेध दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टी-शर्ट परिधान केलेले होते. यावेळी डच सीमेवरूनही काही जण आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले होते.

‘विद्यमान राजकीय व्यवस्था संपुष्टात आणावी’

५७ वर्षीय एक आंदोलक उवे बाचमन याने सांगितले की, मला मोकळे बोलण्याचा, तसेच मास्क न घालण्याचा अधिकार आहे. कोरोनाची भीती असणाºयांबाबत मला आदर आहे; परंतु या महामारीच्या मागे काहीतरी वेगळेच आहे, असे तो म्हणाला.

अन्य एका आंदोलनकर्त्याने सांगितले की, जर्मनीची सध्याची राजकीय व्यवस्था संपुष्टात यावी व १८७१ च्या घटनेकडे पुन्हा परतावे. कारण देशाची सध्याची राजकीय स्थिती बेकायदेशीर आहे.

Web Title: Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.