महिला कॉन्स्टेबलसोबत बेभान होऊन डान्स करत होता पोलीस अधिकारी, व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 16:06 IST2023-02-12T16:02:32+5:302023-02-12T16:06:58+5:30
Social Viral: एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक पोलीस अधिकारी एका महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील डान्स करताना दिसत आहे.

महिला कॉन्स्टेबलसोबत बेभान होऊन डान्स करत होता पोलीस अधिकारी, व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले...
पाकिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक पोलीस अधिकारी एका महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. युझर्स पोलीस अधिकारी कॉन्स्टेबलच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. व्हिडीओमध्ये दोघेही एकत्र डान्स करताना दिसत आहेत. आता त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
पोलीस अधिकारी आणि लेडी कॉन्स्टेबल यांच्यातील डान्सचा हा व्हिडीओ एका पाकिस्तानी युट्युब चॅनेलवरून व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी पांढऱ्या टीशर्मामध्ये तर महिला कॉन्स्टेबल वर्दीमध्ये दिसत आहे. तसेच दोघेही बेभान होऊन नाचत असताना महिला अंगप्रदर्शन करताना दिसत आहे. आता या दोघांवरही कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, या दोघांवरही टीका करताना एका युझरने लिहिले की, अशा लोकांना पोलीस खात्यामध्ये ठेवता कामा नये. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. त्यांनी पोलीस खात्याच्या अब्रू घालवली आहे. त्यांना निलंबित केले गेले पाहिजे.