शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

...म्हणून पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तान आणि चीन सरकारविरोधात स्थानिकांनी काढला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 9:08 AM

भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन पाकिस्तानशी हातमिळवणी करत पाकच्या सीमाभागात हे प्रकल्प सुरु करुन भारताची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुजफ्फराबाद – नीलम आणि झेलम नदीवरील अवैधरित्या बांधकाम करण्याविरोधात पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध प्रदर्शन सुरु झालं आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेलं काश्मीर(पीओके) च्या मुजफ्फराबाद शहरात चीन आणि पाकिस्तानविरोधात लोकांनी आंदोलन केले आहे. नीलम झेलम आणि कोहला हाइड्रो पावर योजनेच्या अवैध निर्माणाविरोधात सोमवारी स्थानिकांकडून एक विशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तान आणि चीनद्वारा निर्मित बंधाऱ्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होईल या मुद्द्याला जागतिक स्तरावर आवाज उचलण्यासाठी हॅशटॅग #SaveRiversSaveAJK असं ट्विटरवर सोशल मीडिया कॅम्पेन सुरु करण्यात आलं आहे. आंदोलनकर्त्यांना विचारले की, पाकिस्तान आणि चीन यांच्यात कोणत्या कायद्यांतर्गत वादग्रस्त क्षेत्र नदीचा करार झाला आहे? त्यावर पाकिस्तान आणि चीन नद्या काबीज करून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे उल्लंघन करीत आहेत. आम्हाला कोहला प्रकल्पाच्या दिशेने कूच करायला पाहिजे आणि तो थांबत नाही तोपर्यंत तिथे निषेध सुरू ठेवावा लागणार आहे असं आंदोलनकर्ते म्हणाले.

अलीकडेच कोहालामध्ये २.४ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीचा १ हजार १२४ मेगावॅट जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी चिनी कंपनीचा पाकिस्तान आणि चीन सरकार यांच्यात त्रिपक्षीय करार झाला. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) अंतर्गत पीओके येथे झेलम नदीवर बांधण्यात येणाऱ्या हायड्रोपावर प्रकल्प कोहाला हायड्रोपावर कंपनी लिमिटेड (केएचसीएल) कंपनीला देण्यात आलं आहे. जी चायना थ्री गॉर्जेज कॉर्पोरेशन (सीटीजीसी) सहाय्यक  कंपनी आहे.

भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन पाकिस्तानशी हातमिळवणी करत पाकच्या सीमाभागात हे प्रकल्प सुरु करुन भारताची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्व लडाखमधील अनेक ठिकाणी गेल्या सात आठवड्यांपासून भारत आणि चिनी सैन्यामध्ये तणाव वाढला आहे आणि १५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत २० भारतीय सैनिक शहीद झाल्याने तणाव आणखी तीव्र झाला. चीन भारताच्या शेजारील नेपाळ आणि पाकिस्तानला हाताशी धरत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र भारताची मुत्सद्देगिरीमुळे चीनचा डाव साध्य होत नसल्याने त्याचा तिळपापड होत आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावPakistanपाकिस्तानchinaचीनPOK - pak occupied kashmirपीओके