शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : "नीलम-झेलम बहने दो, हमें जिंदा रहने दो", पीओकेमध्ये चीनविरोधात लोक रस्त्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 21:58 IST

पीओकेचे पॉलिटिकल एक्टिविस्ट डॉ. अमजद अयूब मिर्झा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, की पीओकेमध्ये अशा प्रकारची निदर्शने बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. मात्र कुणीही यांचे ऐकायला तयार नाही.

ठळक मुद्देपीओकेमध्ये अशा प्रकारची निदर्शने बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. चीनची थ्री गॉरजेस कॉर्पोरेशन येथे अब्जावधी डॉलर्सचा प्रोजेक्ट तयार करत आहे.नुकताच, पाकिस्तान आणि चीनने पीओकेमध्ये आझाद पट्टन आणि कोहला हायड्रो पावर प्रोजेक्ट्स तयार करण्यासाठी करार केला होता.

इस्लामाबाद -पीओकेतील मुझफ्फराबादमधील नागरिकांनी (Muzaffarabad) बुधवारी चिनी कंपनीविरोधात रस्त्यावर उतरून निदर्शन केले. येथील नीलम-झेलम नदीवर चिनी कंपनी मेगा-डॅम तयार करत आहे. निदर्शनादरम्यान स्थानिक लोक 'दरिया बचाओ, मुजफ्फराबाद बचाओ' 'नीलम-झेलम बहने दो, हमें जिंदा रहने दो' सारख्या घोषणा देत होते. 

पीओकेचे पॉलिटिकल एक्टिविस्ट डॉ. अमजद अयूब मिर्झा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, की पीओकेमध्ये अशा प्रकारची निदर्शने बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. मात्र कुणीही यांचे ऐकायला तयार नाही. चीनची थ्री गॉरजेस कॉर्पोरेशन येथे अब्जावधी डॉलर्सचा प्रोजेक्ट तयार करत आहे. त्यांनी नद्यांचा मार्गही बदलला आहे. यामुळेच येथे निदर्शने सुरू आहेत.

नुकताच, पाकिस्तान आणि चीनने पीओकेमध्ये आझाद पट्टन आणि कोहला हायड्रो पावर प्रोजेक्ट्स तयार करण्यासाठी करार केला होता. चीन-पाकिस्तान इकोनॉमीक क्वारिडोरअंतर्गत आझाद पट्टन हायड्रो पावर प्रोजेक्टसंदर्भात 6 जुलैला स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यापासून 700.7 मेगावॅट वीज निर्मिती होईल. 1.54 अब्ज डॉलर्सचा हा प्रकल्प चीनच्या जियोझाबा ग्रुपच्या कंपनीकडे आहे.

कोहला हायड्रोइलेक्ट्रिक पावर प्रोजेक्ट झेलम नदीवर तयार करण्यात येणार आहे. हा प्रोजेक्ट पीओकेच्या सुधनोटी जिल्ह्यातील आझाद पट्टन ब्रिजपासून जवळपास 7 किलोमीटर तर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून 90 किमी अंतरावर आहे. हा प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच हा प्रकल्प चिनी कंपनी थ्री गॉरजेस कॉर्पोरेशन, इंटरनॅशनल फायनांस कॉर्पोरेशन आणि सिल्क बँकेच्या फंडातून तयार होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ, अजित पवार नाराज? जयंत पाटलांनी केला मोठा खुलासा

पंतप्रधान मोदींनी वाजपेयींचा विक्रम मोडला, ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान

Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

टॅग्स :POK - pak occupied kashmirपीओकेPakistanपाकिस्तानchinaचीनDamधरण