G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 18:20 IST2025-11-22T18:20:11+5:302025-11-22T18:20:57+5:30
PM Narendra Modi G20 : जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडले.

G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
PM Narendra Modi G20 : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडले. ‘इनक्लुसिव्ह आणि सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ’ सत्राला संबोधित करताना त्यांनी जागतिक विकासाच्या पॅरामीटर्सचा पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित केली.
विकासाच्या मॉडेलवर पीएम मोदींची टीका
PM मोदी म्हणाले की, जागतिक विकासाचे विद्यमान मॉडेल मोठ्या लोकसंख्येला संसाधनांपासून दूर ठेवतात आणि निसर्गाच्या बेबंद शोषणाला प्रोत्साहन देतात. याचा फटका आफ्रिकेला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. आफ्रिका जेव्हा पहिल्यांदा G20 शिखर परिषद आयोजित करत आहे, तेव्हा विकासाच्या पॅरामीटर्सवर पुन्हा विचार करण्याची हीच वेळ आहे. पंतप्रधानांनी ‘इंटिग्रल ह्यूमनिझम’चा उल्लेख करत सांगितले की मानव, समाज आणि निसर्ग यांना एकत्रित दृष्टीकोनातून पाहिल्यास प्रगती आणि पर्यावरण यांच्यातील समतोल साधला जाऊ शकतो.
I proposed a few actionables to realise our dream of all-round growth. First among them is the creation of a G20 Global Traditional Knowledge Repository. India has a rich history in this regard. This will help us pass on our collective wisdom to further good health and wellbeing.
— Narendra Modi (@narendramodi) November 22, 2025
PM मोदींचे तीन प्रस्ताव
1. ग्लोबल ट्रेडिशनल नॉलेज रिपॉजिटरी
PM मोदींनी सांगितले की, जगभरात अनेक समुदाय आजही परंपरागत, पर्यावरणस्नेही आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जीवनशैली जपून आहेत. त्यांच्या ज्ञानाचे दस्तावजीकरण करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी G20 अंतर्गत ग्लोबल ट्रेडिशनल नॉलेज रिपॉजिटरी निर्माण करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. भारताची Indian Knowledge Systems हे या प्लॅटफॉर्मचा आधार बनू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
2. G20 आफ्रिका स्किल्स मल्टिप्लायर इनिशिएटिव्ह
PM मोदींनी आफ्रिकेच्या विकासाला जगासाठी लाभदायी ठरविताना स्किल डेव्हलपमेंटची तातडीची गरज अधोरेखित केली. त्यांनी G20-Africa Skills Multiplier उपक्रमाची घोषणा केली, ज्याअंतर्गत ‘ट्रेन-द-ट्रेनर्स’ मॉडेल राबवले जाईल आणि यात G20 देश आर्थिक व तांत्रिक मदत करतील. याद्वारे पुढील 10 वर्षांत 10 लाख प्रमाणित प्रशिक्षक आफ्रिकेत तयार करण्याचे लक्ष्य असेल. हे प्रशिक्षक नंतर लाखो आफ्रिकन युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊ शकतील.
3. ड्रग-टेरर नेक्ससविरोधात G20 ची एकत्रित कारवाई
PM मोदींनी फेंटेनाइलसारख्या सिंथेटिक ड्रग्सच्या धोक्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी ड्रग-टेरर नेक्ससचा मुकाबला करण्यासाठी खास G20 उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. या उपक्रमाद्वारे ड्रग तस्करी रोखणे, गैरकायदेशीर पैशांच्या हालचालींवर अंकुश, दहशतवादासाठी होणाऱ्या निधी पुरवठ्याला धक्का बसवणे या उद्दिष्टांसाठी आर्थिक, सुरक्षा आणि गव्हर्नन्स टूल्स एकत्रितपणे वापरण्यात येतील.