शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: चीनला धडा शिकवण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलियाचा मास्टरप्लान; समुद्रात ड्रॅगनला भारी पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 17:32 IST

भारत-ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली/कॅनबेरा: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महत्त्वाची बैठक घेतली. दोन्ही देशांच्या प्रमुखांनी चीनला अप्रत्यक्षपणे कठोर इशारा दिला. चीननं इतर देशांचं सार्वभौतत्व राखावं, अशी अपेक्षा दोन्ही पंतप्रधानांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी हिंदी महासागरातील चीनचा वाढता प्रभाव रोखण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा करार केला. त्यामुळे यापुढे भारत आणि ऑस्ट्रेलियाला एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर करता येईल. भारत आणि ऑस्ट्रेलियाचं भौगोलिक स्थान पाहता दोन्ही देशांनी केलेला करार सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे आता भारत आणि ऑस्ट्रेलियाची लढाऊ जहाजं आणि विमानं एकमेकांच्या तळांचा वापर करू शकतील. याशिवाय जहाजं आणि विमानांना एकमेकांच्या तळांवरील इंधनसाठादेखील वापरता येईल. हिंदी महासागरात चीनचा वावर वाढला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं ऑस्ट्रेलियासोबत करार केला आहे. अशाच स्वरुपाचा करार याआधी भारतानं अमेरिकेसोबत केला आहे. ऑस्ट्रेलियाहून चीनमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनांची निर्यात होते. त्यामुळे चीन ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा आहे. मात्र कोरोनावरून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटुता आली आहे. कोरोना प्रकरणाच्या आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी ऑस्ट्रेलियानं केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत ऑस्ट्रेलियानं युरोपियन युनियननं मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यामुळे चीननं संताप व्यक्त केला. ऑस्ट्रेलिया म्हणजे अमेरिकेचा कुत्रा असल्याची भाषा चीनकडून वापरण्यात आली. ऑस्ट्रेलियाला आर्थिकदृष्ट्या धक्का देण्यासाठी चीननं त्यांच्याकडून येणाऱ्या सामानावरील आयात शुल्कात ८० टक्क्यांची वाढ केली. ऑस्ट्रेलियाच्या चार कत्तलखान्यांमधून येणाऱ्या गोमांसावरही चीननं निर्बंध लादले. लेबलिंगचा मुद्दा उपस्थित करत चीननं ऑस्ट्रेलियावरून येणाऱ्या गोमांसावर थेट बंदी घातली. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. हा तणाव दिवसागणिक वाढतच आहे.अमेरिकेत आंदोलकांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबनाकोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार'मिशन बिगिन अगेन'च्या नियमांत महत्त्वाचा बदल; लाखो नागरिकांचा प्रवास होणार सुलभजगात भारी! जगातील सर्वात मोठं कडीपत्त्याचं झाड; भारतीय शेतकऱ्याचं नाव गिनीज बुकात 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAustraliaआॅस्ट्रेलियाchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी