जगात भारी! जगातील सर्वात उंच कोथिंबिरीचं झाड; भारतीय शेतकऱ्याचं नाव गिनीज बुकात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 03:55 PM2020-06-04T15:55:25+5:302020-06-04T15:57:57+5:30

उत्तराखंडमधल्या प्रगतीशील शेतकऱ्याची कमाल; गिनीज बुकमध्ये नोंद

Uttarakhand farmer bags Guinness record for growing worlds tallest coriander plant | जगात भारी! जगातील सर्वात उंच कोथिंबिरीचं झाड; भारतीय शेतकऱ्याचं नाव गिनीज बुकात

जगात भारी! जगातील सर्वात उंच कोथिंबिरीचं झाड; भारतीय शेतकऱ्याचं नाव गिनीज बुकात

Next

अल्मोडा: संपूर्ण देश कोरोना संकटाचा सामना करत असताना उत्तराखंडमधल्या एका प्रगतीशील शेतकऱ्यानं वेगळीच कमाल केली आहे. त्याबद्दल त्याच्या नावाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे. उत्तराखंडच्या अल्मोडामधल्या ताडीखेत विकासखंड इथे राहणाऱ्या गोपाल दत्त उप्रेती यांनी लावलेल्या कोथिंबिरीच्या झाडाची उंची २.१६ मीटरवर (७ फूट १ इंच) पोहोचली आहे. याआधी जर्मनीतल्या एका व्यक्तीनं लावलेल्या कोथिंबिरीच्या झाडाची वाढ १.८० मीटरपर्यंत (सहा फूट) झाली होती.  

बिल्लेखमध्ये गोपाल दत्त उप्रेती यांचं जीएस ऑर्गेनिक फार्म आहे. याठिकाणी ०.२ हेक्टरवर ते कोथिंबीर आणि लसणाची शेती करतात. याशिवाय १.५ हेक्टरवर सफरचंदांची आणि भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. २१ एप्रिल रोजी मुख्य उद्यान अधिकारी त्रिलोकी नाथ पांडे आणि विवेकानंद पर्वतीय कृषी संशोधन विभागाचे डॉ. गणेश चौधरींनी गोपाल दत्त उप्रेती यांच्या बागेचं निरीक्षण केलं. शेतातल्या कोथिंबिरीची उंची सर्वसाधारण कोथिंबिरीच्या झाडाच्या उंचीपेक्षा जास्त असल्याचं यावेळी त्यांच्या लक्षात आलं. 

त्यावेळी सर्वाधिक उंचीचं कोथिंबिरीचं झाड पाच फूट सात इंचाचं होतं. तर कोथिंबिरीच्या इतर झाडांची उंची पाच फुटांच्या आसपास होती. २७ मे रोजी मुख्य उद्यान अधिकारी पांडे, जैविक उत्पादन परिषद मजखालीचे प्रभारी डॉ. देवेंद्र सिंह नेगी, उद्यान सचल दल केंद्र बिल्लेखचे प्रभारी राम सिंह नेगी यांनी उप्रेती यांच्या शेतातल्या कोथिंबिरीच्या झाडाची उंची मोजली. 

उप्रेती यांच्या शेतातलं सर्वात मोठं कोथिंबिरीचं झाड सात फूट एक इंचाचं आहे. याशिवाय त्यांच्या शेतातली कोथिंबिरीची इतर झाडं पाच ते सात फुटांची आहेत. पेशानं सिव्हिल इंजिनीयर असलेले गोपाल दत्त उप्रेती यांनी गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासाठी अर्ज केला. त्यांनी कोथिंबिरीच्या उंचीसह इतर तपशील गिनीज बुकला पाठवले. कोथिंबिरीच्या झाडाची उंची जास्त असूनही त्याचा गंध किंवा इतर गोष्टींमध्ये फरक पडलेला नाही, असं उप्रेती यांनी सांगितलं.

अमेरिकेत आंदोलकांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार

लॉकडाऊनमध्ये काय चुकलं? राहुल गांधींशी चर्चेदरम्यान राजीव बजाज यांनी नेमकं कारण सांगितलं

केरळमध्ये आणखी एका हत्तीची हत्या?; फटाक्यांचाच वापर केल्याचा संशय

Read in English

Web Title: Uttarakhand farmer bags Guinness record for growing worlds tallest coriander plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.