लँडिंगवेळी विमानाला पक्षांच्या थव्याची धडक; दक्षिण कोरियातील अपघाताचे कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:37 IST2024-12-29T13:36:21+5:302024-12-29T13:37:21+5:30
आज सकाळी दक्षिण कोरियात झालेल्या विमान अपघातात 179 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

लँडिंगवेळी विमानाला पक्षांच्या थव्याची धडक; दक्षिण कोरियातील अपघाताचे कारण आले समोर
Airplane Crash in South Korea : दक्षिण कोरियात आज(दि.29) एक मोठा विमानअपघात झाला. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:07 वाजता बँकॉकवरुन दक्षिण कोरियात 181 प्रवाशांना घेऊन येणारे बोइंग 737 विमान मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगदरम्यान कोसळले. या अपघातात 179 जणांचा मृत्यू झाला असून, दोघांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये सहा क्रु मेंबर्सचाही समावेश आहे.
⚡️DRAMATIC moment South Korean plane with reported 180+ passengers becomes a fireball and crashes at airport CAUGHT on cam pic.twitter.com/VdrdavEXgT
— RT (@RT_com) December 29, 2024
लँडिंग गिअर खराब झाले
सोशल मीडियावर या अपघाताचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये विमान धावपट्टीवरुन घसरताना, त्यात भीषण आग लागल्याचे दिस आहेत. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, विमानाने पक्ष्यांच्या थव्याने धडक दिल्यामुळे त्याचे लँडिंग गियर खराब झाले. लँडिंग गिअर निकामी झाल्यानंतर पायलटने थेट विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. इमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानाचा वेग कमी करता आला नाही आणि विमान धावपट्टीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या बाउंड्री वॉलले धडकले.
#BREAKING An Image from the Crash Site of Jeju Air Flight 2216 at Muan International Airport in South Korea, showing the Tail of the Aircraft engulfed in Flame@fastnewsnetpic.twitter.com/PBNOEyx0DW
— Abdul khabir jamily (@JamilKhabir396) December 29, 2024
विमान धडकताच त्याचा मोठा स्फोट झाला अन् सर्वत्र आग पसरली. हा अपघात इतका भीषण होता की, प्रवाशांना जीव वाचवण्यासाठीच काहीच करता आले नाही. अपघातावेळी विमानात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. प्रवाशांपैकी 173 दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत, तर इतर 2 थायलंडचे होते. सुदैवाने यातील दोन प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.