Plane Crash: 'ही वाईट घटना टाळायला हवी होती", डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात अपघाताबद्दल शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:53 IST2025-01-30T12:49:28+5:302025-01-30T12:53:04+5:30
Washington DC plane crash: अमेरिकेतली वॉशिंग्टन डीसीमध्ये एका प्रवासी विमानाची लष्करी हेलिकॉप्टरला धडक होऊन भयंकर दुर्घटना घडली. या अपघाताबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शंका उपस्थित केली आहे.

Plane Crash: 'ही वाईट घटना टाळायला हवी होती", डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात अपघाताबद्दल शंका
News about plane crash, Washington DC: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये एका प्रवासी विमानाची आणि हेलिकॉप्टरची धडक झाली. हेलिकॉप्टर आणि विमान नदीत कोसळले. यात १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघाताबद्दल शंका उपस्थित केल्या जात असून, खुद्द अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनीच प्रश्न उपस्थित केला आहे. (Plane crashes into Potomac River near Washington, DC airport)
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकन लष्कराचे ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर आणि अमेरिकन ईगलच्या विमानाची धडक झाली. ६५ प्रवासी क्षमता असलेल्या या विमानात वैमानिक, कर्मचाऱ्यांसह ६४ लोक होते, अशी माहिती आतपर्यंत समोर आली आहे. पण, या घटनेबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांनीच एक पोस्ट करत शंका उपस्थित केल्याने, हा अपघात की घातपात? अशी चर्चा सुरू झाली आहे.
Someone tell me how this is not intentional ?
— Mike (@PantherMike182) January 30, 2025
A Blackhawk casually running into an American Airlines passenger plane?
Come on. #planecrash#potomac#DC#Reagan
pic.twitter.com/XqOM6X1GkT
डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणते प्रश्न केले उपस्थित?
अध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "विमान नेहमीच्या वेळेप्रमाणे धावपट्टीकडे जात होते. पण, अचानक या वेळेत हेलिकॉप्टर सरळ विमानाच्या दिशेने जात राहिले. आकाश स्वच्छ होते आणि विमानाचे लाईट्स सुरू होते. हेलिकॉप्टर वर किंवा खाली का नेण्यात आले नाही? जर समोर विमान दिसत होते, तर नियंत्रण कक्षाने हेलिकॉप्टरच्या पायलटला काय करायला हवे हे का सांगितले नाही? ही खूप वाईट परिस्थिती आहे आणि असं दिसतंय की ती टाळायला हवी होती. हे चांगलं झालं नाही", असे प्रश्न उपस्थित करत डोनाल्ड ट्रम्प यांनी शंका उपस्थित केली आहे.
जी माहिती आता समोर आली आहे, त्यानुसार अमेरिकी लष्कराच्या ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरने अमेरिकन ईगलच्या विमानाला धडक दिली. त्यानंतर हेलिकॉप्टर आणि विमान नदीत कोसळले. या प्रकरणाचा आता अमेरिकेची केंद्रीय तपास यंत्रणा एफबीआयने तपास सुरू केला आहे.