फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:47 IST2025-10-01T14:46:57+5:302025-10-01T14:47:37+5:30

फिलिपाईन्स प्रशांत महासागराच्या "रिंग ऑफ फायर" भागात असल्याने येथे सतत भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक आणि वादळांचा धोका कायम असतो.

Philippines Earthquake : 69 people killed, hundreds injured in Philippines earthquake; Watch shocking video | फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...

फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...

Philippines Earthquake : फिलिपाईन्समध्ये मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. या शक्तिशाली धक्क्यांमुळे सेबूसह अनेक भागातील इमारती कोसळल्या, रस्त्यांवर भेगा पडल्या आणि वीजपुरवठाही खंडित झाला. या घटनेत आतापर्यंत 69 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून 150 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भूकंप 10 किमी खोलीवर झाला असल्याचे भू-वैज्ञानिक संस्थांचे म्हणणे आहे. 6.9 इतका सर्वात मोठा धक्का नोंदवला गेला. सुरुवातीला सुनामीचा इशारा देण्यात आला होता; मात्र नंतर तो मागे घेण्यात आला. भूकंपामुळे अनेक पूल, रस्ते व इमारतींचे मोठे नुकसान झाले. बोगो व मेडेलिन परिसरात घरे कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. 

सैन रेमिगियो येथेही भिंती कोसळून बास्केटबॉल खेळ पाहणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला. बंटायन भागात शतकानुशतके जुन्या सेंट पीटर द एपोस्टल चर्चचे छप्पर व भिंती भूकंपात कोसळल्या. बचावपथकांना रस्ते मोकळे करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. विजेचा आणि पाण्याचा पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. 

राष्ट्राध्यक्ष फर्डिनंड मार्कोस ज्युनियर यांनी तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सेबू प्रांताच्या राज्यपाल पामेला बारिकुआत्रो यांनी परिस्थिती आणखी भीषण असू शकते, असे सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये या भूकंपाची तीव्रता आणि भीषणता दिसून येते.

विशेष म्हणजे, फिलिपाईन्स हा जगातील सर्वाधिक आपत्ती-प्रवण देशांपैकी एक आहे. प्रशांत महासागराच्या "रिंग ऑफ फायर" भागात असल्याने येथे सतत भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक आणि वादळांचा धोका कायम असतो. 

Web Title : फिलीपींस में भूकंप: 69 की मौत, सैकड़ों घायल; चौंकाने वाले वीडियो सामने आए

Web Summary : फिलीपींस में 6.9 तीव्रता के भूकंप से 69 लोगों की मौत हो गई और सैकड़ों घायल हो गए। इमारतें ढह गईं, सड़कें फट गईं और बिजली बाधित हो गई। 10 किमी गहराई पर आए भूकंप के बाद सुनामी की चेतावनी जारी की गई। राष्ट्रपति मार्कोस जूनियर ने तत्काल सहायता का आदेश दिया।

Web Title : Philippines Earthquake: 69 Dead, Hundreds Injured; Shocking Videos Emerge

Web Summary : A 6.9 magnitude earthquake struck the Philippines, killing 69 and injuring hundreds. Buildings collapsed, roads cracked, and power was disrupted. The quake, centered 10 km deep, initially triggered a tsunami warning. Rescue operations are underway amidst widespread damage; President Marcos Jr. has ordered immediate aid.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.