मधुमेह, लठ्ठपणा अन् हृदयरोग असेल तर मिळणार नाही अमेरिकेचा व्हिसा, स्थलांतरण रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 07:49 IST2025-11-09T07:49:25+5:302025-11-09T07:49:48+5:30

United State News: अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्यासाठी किंवा अमेरिकेत ग्रीन कार्ड असलेल्यांना ट्रम्प प्रशासनाच्या नव्या व्हिसा नियमांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

People with diabetes, obesity and heart disease will not be able to get a US visa, Trump administration orders to stop immigration | मधुमेह, लठ्ठपणा अन् हृदयरोग असेल तर मिळणार नाही अमेरिकेचा व्हिसा, स्थलांतरण रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचा आदेश

मधुमेह, लठ्ठपणा अन् हृदयरोग असेल तर मिळणार नाही अमेरिकेचा व्हिसा, स्थलांतरण रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचा आदेश

वॉशिंग्टन - अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्यासाठी किंवा अमेरिकेत ग्रीन कार्ड असलेल्यांना ट्रम्प प्रशासनाच्या नव्या व्हिसा नियमांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ज्या परदेशी नागरिकांना किंवा अमेरिकेत राहणाऱ्या ग्रीनकार्डधारकांना मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोगसारखे अन्य गंभीर आजार आहेत, ते अमेरिकेचा व्हिसा मिळण्यास अपात्र ठरतील, असे निर्देश अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने आपले दूतावास व कॉन्सुलर अधिकाऱ्यांना दिले आहेत. आजाराग्रस्त परदेशी नागरिकांच्या उपचाराचा खर्च अमेरिकेच्या तिजोरीवर पडू नये व अन्य संसाधनांवर त्यांच्यावर भार पडू नये, म्हणून हे निर्देश आहेत.

ज्यांची आर्थिक ऐपत त्यांचा विचार
ज्या परदेशी नागरिकांची वा ग्रीनकार्ड धारकांची त्यांच्या जडलेल्या आजारावर उपचार करण्याची आर्थिक ऐपत असेल, त्यांचा आर्थिक व सामाजिक भार अमेरिकेच्या संसाधनांवर पडत नसेल तर अशांचे व्हिसा अर्ज काळजीपूर्वक पाहून त्यावर निर्णय घ्यावा, असेही निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत. अमेरिकेत अद्ययावत उपचार मिळतात. तेथे विमा कंपन्यांव्यतिरिक्त सरकार उपचारांवरचा खर्च मोठ्या प्रमाणात उचलते. 

कोणकोणते आजार?
हृदय व रक्ताभिसरणसंबंधी रोग, श्वसनाचे रोग, कर्करोग, मधुमेह, चयापचय रोग, मेंदूविषयक आजार आणि मानसिक आरोग्य स्थिती यांचा निर्देशांत समावेश आहे. हे आजार बरे करण्यास प्रचंड पैसा खर्च होतो, असे अमेरिकेच्या गृहमंत्रालयाचे म्हणणे आहे. अमेरिकेचा व्हिसा मिळवताना काही रोगांच्या लसी घेणे बंधनकारक आहे. ती प्रक्रियाही सुरूच राहणार आहे. आताचे बदल नव्हेत.

Web Title : मधुमेह, मोटापे, हृदय रोगियों को अमेरिकी वीजा नहीं: ट्रम्प का आदेश

Web Summary : नए अमेरिकी वीजा नियमों के तहत मधुमेह, मोटापे या हृदय रोग वाले आप्रवासियों को प्रवेश नहीं मिल सकता है। इस निर्देश का उद्देश्य अमेरिकी स्वास्थ्य सेवा संसाधनों पर वित्तीय बोझ को रोकना है। इलाज के लिए पर्याप्त वित्तीय साधन वालों पर विचार किया जा सकता है।

Web Title : US Visa Denied for Diabetics, Obese, and Heart Patients: Trump Order

Web Summary : New US visa rules may deny entry to immigrants with diabetes, obesity, or heart disease. The directive aims to prevent financial burden on US healthcare resources. Those with sufficient financial means for treatment may still be considered.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.