शांतता... विराम सुरू; अमेरिका 'होर्मुझ' जलवाहतुकीची समस्या सोडविण्यास मदत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 09:13 IST2026-04-09T09:12:29+5:302026-04-09T09:13:05+5:30

युरेनियम बाहेर काढून त्याची योग्य विल्हेवाट लावणार, युद्धविराम पश्चिम आशियासाठी सुवर्णयुग: ट्रम्प

Peace... the truce is on; America will help solve the global problem of 'Hormuz' navigation | शांतता... विराम सुरू; अमेरिका 'होर्मुझ' जलवाहतुकीची समस्या सोडविण्यास मदत करणार

शांतता... विराम सुरू; अमेरिका 'होर्मुझ' जलवाहतुकीची समस्या सोडविण्यास मदत करणार

न्यूयॉर्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, इराण, अमेरिका-इस्रायलमध्ये युद्धविराम करार झाला असून, तो जागतिक शांततेच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. पश्चिम आशियासाठी ही घटना सुवर्णयुग ठरणार आहे. अमेरिका होर्मुझमधून जलवाहतुकीबाबत निर्माण झालेली समस्या सोडविण्यास मदत करणार आहे. या युद्धविराम कराराचे इराणला अनेक फायदे होतील. त्या देशाला मोठा आर्थिक फायदा होईल. त्यामुळे इराण त्यांच्या देशातील सुविधांच्या पुनर्बांधणी प्रक्रियेला सुरुवात करू शकतो, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

‘इराणच्या युरेनिअमची योग्य विल्हेवाट लावणार’

ट्रम्प म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांमध्ये इराणने दडवून ठेवलेले समृद्ध युरेनियम तिथून बाहेर काढून आम्ही त्याची योग्य विल्हेवाट लावणार आहोत.  त्यासाठी अमेरिका इराणची मदत घेणार आहे. यापुढे त्या देशात युरेनियमचे समृद्धीकरण होणार नाही तसेच गेल्या जूनमध्ये अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांत या युरेनिअमला आम्ही हात लावला नव्हता.

रशियाने केले युद्धविरामाचे स्वागत

अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या यु्द्धविराम कराराचे रशियाने बुधवारी स्वागत केले आहे. इराणमधील नागरी वस्त्या, आर्थिक पायाभूत सुविधांवर हल्ला न करण्याच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले, या युद्धविराम करारामुळे पश्चिम आशियामध्ये शांतता निर्माण होईल.

अमेरिकन लष्कराने इराणविरुद्धची कारवाई दोन आठवडे थांबविली आहे, असे अमेरिकी लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तरीदेखील संरक्षणात्मक उपाययोजना या सुरूच राहतील, असेही त्याने सांगितले.

...तर युद्धविराम धोक्यात येऊ शकतो

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम जाहीर झाली असली तरी इस्रायलने स्पष्ट केले आहे की ही शस्त्रसंधी लेबनॉनसाठी लागू नाही, त्यामुळे लेबनॉनमधील हल्ले सुरूच ठेवण्यात आले. या सततच्या संघर्षामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर लेबनॉन सरकारने इस्रायलच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची मागणी केली आहे. इराणनेही इशारा दिला आहे की असे हल्ले सुरू राहिल्यास अमेरिका-इराण युद्धविराम धोक्यात येऊ शकते. एकूणच, या घटनांमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

लेबनॉनवर हल्ला, २५४ जणांचा मृत्यू

८ एप्रिल २०२६ रोजी इस्रायलने लेबनॉनवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले असून या भीषण कारवाईत २५४ जणांचा मृत्यू झाला आणि ७०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. हे हल्ले बेइरुत, बेक्का व्हॅली आणि दक्षिण लेबनॉन या भागांमध्ये करण्यात आले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इस्रायलने या कारवाईत प्रामुख्याने इराण समर्थित हिझबुल्ला संघटनेच्या तळांना लक्ष्य केले असल्याचे सांगितले आहे, मात्र या हल्ल्यांचा फटका सामान्य नागरिकांनाही बसला आहे. मृतांमध्ये काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे, तर रुग्णालयांवर जखमींचा मोठा ताण पडला आहे.

प. आशियातील तणाव कमी करणार : ब्रिटन

ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनी बुधवारी आखाती देशांच्या दौऱ्याला प्रारंभ केला. अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या युद्धविरामाला सर्वांनी पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर ते या दौऱ्यात चर्चा करणार आहेत. पश्चिम आशियात तणाव कमी करण्यासाठी ब्रिटन प्रयत्नशील राहील याचा स्टार्मर यांनी पुनरुच्चार केला आहे.

हिजबुल्लाविरुद्ध कारवाई सुरू ठेवणार : इस्रायल

इस्रायलच्या लष्कराने बुधवारी सांगितले की, लेबनॉनमधील हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या विरोधात आमची कारवाई सुरूच राहील.  पश्चिम आशियातील दोन आठवड्यांच्या युद्धविरामाचा भाग म्हणून इस्रायल लेबनॉनवरील हल्ले थांबवेल, असे पाकिस्तानने म्हटले होते.

युद्धविराम लागू होण्यापूर्वी आम्ही इराणवरही हल्ले केले, हे इस्रायलने मान्य केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यापूर्वी सांगितले होते की, इराणसोबतचा युद्धविराम पाळला जाईल; पण, हिजबुल्लाविरुद्धची कारवाई सुरूच राहील. याबाबत हिजबुल्लाने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

चीनचे इराणला राजी करण्यासाठी प्रयत्न

इराणचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार असलेल्या चीनने त्या देशाशी संपर्क साधला व अमेरिकेसोबत युद्धविराम करण्यास त्यांना राजी करण्यासाठी प्रयत्न केले, ही माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात चिनी अधिकारी इराणच्या सातत्याने संपर्कात होते. या वृत्तावर चीन, इराणने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Web Title : अमेरिका होर्मुज जलडमरूमध्य मुद्दा सुलझाने में मदद करेगा; संघर्षविराम शुरू

Web Summary : अमेरिका ने वैश्विक शांति के लिए ईरान-इज़राइल युद्धविराम कराया, ईरान को आर्थिक लाभ की पेशकश की। युद्धविराम के बावजूद, इज़राइल ने लेबनान पर हमले जारी रखे, जिससे समझौता खतरे में पड़ गया। चीन ने ईरान से युद्धविराम के लिए सहमत होने का आग्रह किया।

Web Title : US to Help Solve Hormuz Strait Issue; Ceasefire Begins

Web Summary : US brokered Iran-Israel ceasefire for global peace, offering economic benefits to Iran. Despite the truce, Israel continues Lebanon attacks, jeopardizing the agreement. China urged Iran to agree ceasefire.