प्रक्षेपण झाल्यापासून पाकिस्तानच्या उपग्रहाची उडतेय खिल्ली, युझर्स म्हणताहेत, ‘’कुठली टाकी चोरून नेली?’’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:58 IST2025-01-18T12:56:29+5:302025-01-18T12:58:35+5:30
Pakistan's satellite News: पाकिस्तानने शुक्रवारी चीनमधील जिउक्वान उपग्रceह प्रक्षेपण केंद्रातून आपला पहिला स्वनिर्मित इलेक्ट्रो-ऑप्टिकल उपग्रह प्रक्षेपित केला. मात्र सोशल मीडियावर हा उपग्रह चेष्टेचा विषय ठरत आहे.

प्रक्षेपण झाल्यापासून पाकिस्तानच्या उपग्रहाची उडतेय खिल्ली, युझर्स म्हणताहेत, ‘’कुठली टाकी चोरून नेली?’’
पाकिस्तानने शुक्रवारी चीनमधील जिउक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून आपला पहिला स्वनिर्मित इलेक्ट्रो-ऑप्टिकल उपग्रह प्रक्षेपित केला. या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी याबाबत सोशल मीडियावर कौतुकपर पोस्ट शेअर केली. मात्र शरीफ यांनी या उपग्रहासंदर्भात पोस्ट टाकली तेव्हा सोशल मीडियावरील युझर्सनीं त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. या उपग्रहाची डिझाइन हा विशेषकरून चेष्टेचा विषय ठरली आहे. लोक या उपग्रहाची तुलना पाण्याच्या टाकीशी करत आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या उपग्रहाचा फोटो शेअर करत या यशाचं कौतुक केलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, देशासाठी अभिमानाचा क्षण, पाकिस्तानने चीनच्या जिउक्वान उपग्रह प्रक्षेपण सेंटरमधून आपल्या पहिल्या स्वदेशी इलेक्ट्रो ऑप्टिकल उपग्रहाचं यशस्वीरीत्या प्रक्षेपण केलं. सुपरकोच्या नेतृत्वात केलेली ही कामगिरी अंतराळ विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात देशाच्या वाढत्या क्षमतेचं दर्शन घडवते. आमचे शास्त्रज्ञ आणि इंजिनियर यांचं समर्पण आणि सांघिक कामगिरीला दर्शवते.
मात्र शाहबाज शरीफ यांनी ही पोस्ट केल्यापासून नेटिझन्सनी मोर्चा उघडून त्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. तसेच काही जणांनी या उपग्रहाला पाण्याच्या टाकीची उपमा देत टाकीचे फोटो शेअर केले. एकाने तर या उपग्रहासह पूर आलेल्या परिसराचा व्हिडीओ शेअर केला आणि शाहबाज शरीफ यांना उद्देशून लिहिले की, हॅलो भाई मोटार बंद करा, पाणी भरलं आहे. तर आणखी एकाने उपग्रह म्हणून पाण्याच्या टाकीचा फोटो शेअर केला आहे. तर एकाने लिहिलं की, कुणाची पाण्याची टाकी चोरून आणली?