शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
2
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
3
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
4
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
5
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
7
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
10
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
11
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
12
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
13
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
14
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
15
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
16
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
17
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
20
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  

दहशतवादी हाफिझ सईदची संघटना लढवणार 2018 साली होणारी पाकिस्तानची सार्वत्रिक निवडणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 10:20 PM

लाहोर, दि. 18 -  26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड आणि भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करत असलेला कुख्यात दहशतवादी हाफीझ सईदची संघटना आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. हाफिझ सईदची जमात उल दावा पुढच्या वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. जमात उल दावा या ...

लाहोर, दि. 18 -  26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड आणि भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करत असलेला कुख्यात दहशतवादी हाफीझ सईदची संघटना आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. हाफिझ सईदची जमात उल दावा पुढच्या वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. जमात उल दावा या दहशतवादी संघटनेने गेल्या महिन्यात मिल्ली मुस्लिम लीग नावाचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. लाहोरमध्ये नॅशनल असेंब्लीच्या एनए-120 जागेसाठी  नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जमात उल दावाचा पाठिंबा असलेले उमेदवार शेख याकूब याचे नामांकन रद्द झाले होते. या मतदार संघातून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरिफ यांची पत्नी कुलसूम नवाझ विजयी झाली होती. तर पाकिस्तान तहरिक - ए- इन्साफ पक्षाची उमेदवार यास्मिन रशिद तिसऱ्या स्थानी राहिली होती.  याबाबत याकूब म्हणाला, "ही संघटना पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात आपले उमेदवार उभे करणार आहे." याकूब हा मिल्ली मुस्लिम लीगच्या झेंड्याखाली  एनए-120 मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होता. मात्र त्याला असे करता आले नाही. कारण हा पक्ष पाकिस्तानी निवडणूक आयोगाकडे अद्याप नोंदणीकृत झालेला नाही. अमेरिकी वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकी वित्त विभागाने 2012 साली प्रसिद्ध केलेल्या बंदी घालण्यात आलेल्या लोकांच्या यादीत याकुबचेही नाव होते.  निवडणुकीतील अनुभवाबाबत याकुब म्हणाला, "आम्हाला एनए 120 मतदारसंघात मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही राजकीय मैदानात पाय रोवण्यासाठी आलो आहोत, असा संदेश आम्ही जनतेला दिला आहे. लोकांनाही  पाकिस्तानला भारत, अमेरिका आणि इस्राइलसारख्या शत्रूंविरोधात प्रबळ बनवणारा आणि मुलभूल समस्या सोडवणारा पक्ष हवा आहे. 2008 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदची संघटना 'जमात-उद-दावा'ने राजकारणात प्रवेश करत असल्याची घोषणा गेल्या महिन्यात केली होती. हाफिज सईदच्या या राजकीय पक्षाला 'मिल्ली मुस्लिम लीग' असे नाव देण्यात आले होते. 'जमात-उद-दावा'चा वरिष्ठ सदस्य सैफुल्लाह खालिद याची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.  हाफिज पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आहे. भारतातील विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये तोयबाचा हात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय सुमदायाने तोयबावर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकला होता. या दबावानंतर समाजसेवा करत असल्याचे भासवण्यासाठी हाफिजने  जमात उल दावाची स्थापना केली. मात्र, हाफिजची ही चतुराई फार काळ टिकली नाही. अमेरिकेने 2014 मध्येच जमात उल दावालाही दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते.

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान