Pegasus Spyware: पेगासस सॉफ्टवेयरच्या फोन टॅपिंग लिस्टमध्ये पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 16:50 IST2021-07-20T16:45:55+5:302021-07-20T16:50:04+5:30
Pegasus Spyware: पेगाससच्या यादीत भारतातील 1,000 आणि पाकिस्तानातील 100 नंबर्सचा समावेश

Pegasus Spyware: पेगासस सॉफ्टवेयरच्या फोन टॅपिंग लिस्टमध्ये पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव
इस्लामाबाद: भारतात सध्या इस्रायलच्या पेगासस स्पायवेयर( Pegasus Spyware) द्वारे फोन टॅपिंग केल्याच्या मुद्याने जोर पकडला असताना, तिकडे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचाही फोन हॅक झाल्याचा दावा पाकिस्तान सरकारकडून करण्यात येतोय. फोन टॅपिंग केलेल्या नंबरच्या यादित इम्रान खान यांच्या एका नंबरचा समावेश होता, असा दावा अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.
ही रिपोर्ट समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणातही खळबळ माजलीये. पाकिस्तानी मीडिया डॉन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे IT मंत्री फवाद चौधरींनी हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची धमकी दिली आहे. चौधरींनी या हेरगिरीमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला आहे. तसेच, या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचावर उपस्थित केला जाईल, असंही ते म्हणाले.
पेगाससच्या यादीत भारतातील 1,000 नंबर
वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, पेगाससच्या सर्विलांस लिस्टमध्ये भारतातील 1,000 आणि पाकिस्तानातील 100 नंबर्सचा समावेश आहे. स्पायवेयर सॉफ्टवेयर पेगासस इस्रायली फर्म NSO ग्रुप टेक्नोलॉजीजने तयार केले आहे. ही कंपनी हॅकिंग सॉफ्टवेयर बनवण्यात पुढे आहे. त्यांचा दावा आहे की, अनेक देशांच्या सरकारने गुप्तहेरीसाठी त्यांच्या सॉफ्टवेयरचा वापर केला आहे.