एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 14:57 IST2025-04-28T14:55:52+5:302025-04-28T14:57:32+5:30
Pakistani Army Medals: तुम्ही अनेकदा पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांच्या छातीवर अनेक पदके पाहिली असतील.

एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
Pakistani Army :पाकिस्ताननेभारताविरोधात अनेक युद्धे लढली आहेत अन् प्रत्येकवेळी पराभवाचा सामना करावा लागला आहे. केवळ भारतच नाही, तर जेव्हा जेव्हा पाकिस्तान इतर देशांशी सामना करतो, तेव्हा तेव्हा पाकिस्तानी सैन्याला पराभवाला सामोरे जावे लागते. तरीदेखील पाकिस्तानच्या सैन्यातील अधिकारी आपल्या छातीवर अनेक पदके लावून फिरतात. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, एकही युद्ध न जिंकणाऱ्या पाकिस्तानचे सैन्य अधिकारी आपल्या छातीवर इतकी पदके का लावतात? चला तर मग जाणून घेऊया पाकिस्तानी सैन्याच्या या पदकांमागील कहाणी काय आहे...
पाकिस्तानचा अनेक युद्धात पराभव
भारत-पाकिस्तान युद्ध (1947-48), भारत-पाकिस्तान युद्ध (1965), भारत-पाकिस्तान युद्ध (1971) आणि कारगिल युद्ध (1999) मध्ये पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाला आहे. याशिवा पाकिस्तानला अनेकप्रसंगी राजनैतिक पराभवालाही सामोरे जावे लागले आहे.
पाकिस्तान अधिकाऱ्यांना पदके का देतो?
प्रत्येक देशाचे सैन्य त्यांच्या सैनिकांना त्यांची सेवा, शौर्य इत्यादी लक्षात घेऊन पदके देते. उदाहरणार्थ, युद्धात सहभाग, शौर्य किंवा विशेष ऑपरेशन्समध्ये योगदान दिल्याबद्दल पदके दिली जातात. याच कारणास्तव, पराभवानंतरही पाकिस्तानमधील अनेक सैनिकांना पदके देण्यात आली आहेत. याशिवाय, केवळ युद्धासाठीच नाही, तर पाकिस्तानच्या ऑपरेशन झर्ब-ए-अज्ब सारख्या अंतर्गत कारवायांसाठीदेखील पदके दिली जातात. पदके ही प्रत्येक देशाच्या सैन्यातील परंपरेचा भाग आहे.
ज्याप्रमाणे भारताने अनेक वर्षांपासून कोणतेही युद्ध लढलेले नाही, पण तरीही सैनिकांना शांतता काळातील पदके दिली जातात, तसेच पाकिस्तानमध्येही घडते. पाकिस्तानी लष्कराने 1947, 1965, 1971 च्या युद्धांसाठी, तसेच 1970 च्या बलुचिस्तानमधील ऑपरेशन, सियाचीन वाद, शिया बंडखोरी, अंतर्गत बाबी इत्यादींसाठी आपल्या सैनिकांना पुरस्कार दिले आहेत.
पाकिस्तान किती प्रकारची पदके देतो?
पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी शौर्य पुरस्कार निशान-ए-हैदर आहे. हे पदक फक्त पाकिस्तान सशस्त्र दलाच्या सदस्यांना दिले जाते. हा पुरस्कार असाधारण शौर्यासाठी दिले जाते. यानंतर हिलाल-ए-जुरत, सितारा-ए-जुरत, तमघा-ए-जुरत आणि इम्तियाजी पदके दिली जातात. नॉन-ऑपरेशनल पुरस्कारांमध्ये सितारा-ए-बिसलत, तमघा-ए-बिसलत, तमघा-ए-खिदमत वर्ग-1, तमघा-ए-खिदमत वर्ग-2, तमघा-ए-खिदमत वर्ग-3 यांचा समावेश आहे. तर, नागरी लष्करी पुरस्कारांमध्ये निशान-ए-इम्तियाज, हिलाल-ए-इम्तियाज, सितारा-ए-इम्तियाज, तमघा-ए-इम्तियाज, तमघा-ए-खिदमत यांचा समावेश आहे.