इराणी नेत्यासोबत पाकिस्तान शांतता करारावर वाटाघाटी करत होता; अमेरिकेने त्यांच्यावर केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 18:33 IST2026-04-02T18:31:27+5:302026-04-02T18:33:54+5:30

अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणचे माजी परराष्ट्र मंत्री कमाल खराझी यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. या हल्ल्यात खराझी गंभीर जखमी झाले. ८१ वर्षीय खराझी हे इराणच्या सर्वोच्च नेत्याचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार होते. इराणच्या वतीने पाकिस्तानसोबत शांतता करारावर वाटाघाटी करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती.

Pakistan was negotiating a peace deal with Iranian leader; US attacked him | इराणी नेत्यासोबत पाकिस्तान शांतता करारावर वाटाघाटी करत होता; अमेरिकेने त्यांच्यावर केला हल्ला

इराणी नेत्यासोबत पाकिस्तान शांतता करारावर वाटाघाटी करत होता; अमेरिकेने त्यांच्यावर केला हल्ला

मागील एक महिन्यापासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम जगावर झाला आहे, अनेक देशांमध्ये गॅस आणि पेट्रोलची टंचाई भासत आहे. आता हे युद्ध थांबवण्यासाठी काही देशांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कमाल खराझी यांच्यासोबत पाकिस्तान चर्चा करत होते, आता त्याच नेत्यावर अमेरिकेने हल्ला केल्याचे समोर आले आहे. खराझी पूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री होते. सध्या पाकिस्तान शांतता करारासंदर्भात त्यांच्या संपर्कात होता. पाकिस्तानकडून सर्व संदेश खराझी यांना पाठवले जात होते. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात खराझी गंभीर जखमी झाले.

इराणी माध्यमात आलेल्या वृत्तानुसार, बुधवारी (१ एप्रिल) तेहरानच्या अझौरानीयेह भागातील खराझी यांच्या घरावर हल्ला झाला. या हल्ल्यात खराझी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांची खिल्ली; "ज्यांची बायको क्रूर वागते..."

कमाल खराझी कोण आहेत?

८१ वर्षीय कमाल खराझी हे एक प्रख्यात इराणी मुत्सद्दी मानले जातात. खराझी यांनी १९९७ ते २००५ या काळात इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिले. राजीनामा दिल्यानंतर ते सर्वोच्च नेत्यांच्या कार्यालयात रुजू झाले. खराझी हे इराणचे दुसरे सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनेई यांच्या जवळचे मानले जात होते.

खराझी सध्या मोजतबा खामेनेई यांचे परराष्ट्र सल्लागार आहेत. म्हणूनच पाकिस्तान खराझी यांना आपला संदेश पाठवत होता. इराणमध्ये जन्मलेले खराझी अमेरिकेत शिकले. त्यांनी १९७५ मध्ये ह्युस्टन विद्यापीठातून पीएचडी मिळवली.

८१ वर्षीय खराझी हे इराणच्या वतीने शांतता करार घडवून आणण्यात सक्रियपणे सहभागी होते. यामुळे त्यांच्यावर हल्ला का झाला, हा प्रश्न निर्माण होतो. खराझी यांच्यावरील हल्ल्याबाबत इस्रायलने कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.

Web Title : ईरान के नेता के साथ पाकिस्तान की शांति वार्ता पर अमेरिका का हमला।

Web Summary : अमेरिका-ईरान युद्ध के बीच, पाकिस्तान ने कमाल खराज़ी के साथ शांति वार्ता की। अमेरिका ने शांति वार्ता में शामिल ईरान के पूर्व विदेश मंत्री खराज़ी पर हमला किया, जिससे वे गंभीर रूप से घायल हो गए। कथित तौर पर उन्हें तेहरान स्थित उनके घर पर निशाना बनाया गया।

Web Title : US attacks Iranian leader negotiating Pakistan peace deal amid war.

Web Summary : Amid US-Iran war, Pakistan negotiated peace with Kamal Kharazi. The US attacked Kharazi, a former Iranian foreign minister, involved in peace talks, seriously injuring him. He was reportedly targeted at his Tehran home.